Advertisement

गरज पडल्यास तलवारी काढू- संभाजीराजे

माझा पक्ष गेला खड्यात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. असं केंद्र आणि राज्य सरकारला आव्हान देतानाच राज्यात होणारी आंदोलनं ही भाजपा पुरस्कृत नाहीत असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.

गरज पडल्यास तलवारी काढू- संभाजीराजे
SHARES

आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका. संयम कधी सोडायचा माहीत आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, अशा शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवार ९ आॅक्टोबर २०२० रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापूरमधून सुरुवात झाली. या मोर्चात भाजप खासदार संभाजीराजे आणि खासदार ओमराजे निंबाळकर सहभागी झाले होते. (bjp mp sambhaji raje chhatrapati gives threat to maharashtra government on maratha reservation)

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे म्हणाले की, मराठा आरक्षण टिकवण्यासाठी ठाकरे सरकारचे प्रयत्न कमी पडत आहेत असं दिसून येतं आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयही नाही. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका. संयम कधी सोडायचा माहीत आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला.

हेही वाचा - हा लढून मरणारा समाज- संभाजीराजे

शाहू महाराजांनी १९०२ मध्ये  पहिल्यांदा आरक्षण दिलं होतं. त्यात मराठा समाजाचाही समावेश होता. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची स्वराज्याची संकल्पना पुन्हा एकदा प्रस्थापित होणं आवश्यक आहे. ८० टक्के मराठा समाज गरीब आहे. मात्र आम्ही भीक मागत नाही हक्काचे आरक्षण मागतो आहोत. आम्हाला आता गृहीत धरु नका आणि कायदा हातात घ्यायची वेळ आमच्यावर आणू नका. माझ्या रक्तात शिवाजी महाराज आणि शाहू महाराज आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार, त्यासाठी दिल्लीला येण्यासाठीही घाबरणार नाही, माझा पक्ष गेला खड्यात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. असं केंद्र आणि राज्य सरकारला आव्हान देतानाच राज्यात होणारी आंदोलनं ही भाजपा पुरस्कृत नाहीत असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.  

येत्या १५ आॅक्टोबरला अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा