Advertisement

हा लढून मरणारा समाज- संभाजीराजे

बीडमधील विवेक राहाडे या युवकाने आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली. विद्यार्थ्याला श्रद्धांजली वाहताना भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजातील तरूणांना आत्महत्येसारखे पर्याय निवडू नका, असं कळकळीचं आवाहन केलं आहे.

हा लढून मरणारा समाज- संभाजीराजे
SHARES

बीडमधील विवेक राहाडे या युवकाने आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली. विद्यार्थ्याला श्रद्धांजली वाहताना भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजातील तरूणांना आत्महत्येसारखे पर्याय निवडू नका, असं कळकळीचं आवाहन केलं आहे. 'लढून मरावं, मरून जगावं हेच आम्हाला ठावं', असे पोवाडे गाणारा हा समाज आहे हे लक्षात ठेवा, अशी आठवण देखील त्यांनी तरूणांना करून दिली आहे. (do not attempt suicide for maratha reservation appeals bjp mp sambhaji raje bhosale to youth)

मी नुकतीच नीट ही मेडिकलची परीक्षा दिली आहे. परंतु मराठा आरक्षण गेल्यामुळे नीटमध्ये नंबर लागत नाहीय. तर घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याची ऐपत नाही. मी मेल्याने तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि माझं मरण सार्थक होईल, अशा हताश भावना विवेक राहाडे या युवकाने आत्महत्येआधी लिहिलेल्या पत्रात व्यक्त केल्या आहेत. 

मराठा आरक्षण प्रश्नावर राजकीय पातळीवर प्रयत्नशील असणारे संभाजीराजे भोसले यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.

हेही वाचा - संभाजीराजे, उदयनराजेंनी भाजपकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा- शरद पवार

मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही.

माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत.

विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. 

समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली!

अशा शब्दांत संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजातील तरूणांना आत्महत्येचा पर्याय न निवडण्याचं आवाहन केलं आहे.


संबंधित विषय
Advertisement