Advertisement

तर, रस्त्यावर उतरणार, संभाजीराजेंचा इशारा

मराठा आंदोलनकर्त्यांची भेट सोमवारी भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले (bjp mp sambhajiraje bhonsale) यांनी घेतली.

तर, रस्त्यावर उतरणार, संभाजीराजेंचा इशारा
SHARES

राज्य सरकारच्या आश्वासनानंतरही समाधान न झाल्याने मुंबईतील आझाद मैदानात मराठा तरूणांचं आंदोलन (Maratha reservation) सुरूच आहेत. या आंदोलनकर्त्यांची भेट सोमवारी भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले (bjp mp sambhajiraje bhonsale) यांनी घेतली. यावेळी हे सरकार नेमकं कोण चालवतंय? अधिकारी की मुख्यमंत्री? असा प्रश्न उपस्थित करत मराठा तरूणांना न्याय मिळत नसेल, तर रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशारा दिला. 

हेही वाचा- हे सरकार शंभर टक्के मराठाविरोधी, नितेश राणेंची सरकारवर टीका

मराठा आरक्षण २०१८ अधिनियम ६२ क्रमांक १८ नुसार मराठा समाजाच्या (Maratha reservation) उमेदवारांची विविध शासकीय नोकऱ्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली असूनही प्रत्यक्षात नियुक्ती पत्र न देण्यात आल्याने संतापलेल्या मराठा तरुणांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण (protest azad maidan) सुरू केलं आहे. या आंदोलकांना भेटायला गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी कायदेशीर पद्धतीने काय करता येईल, ते पाहू. सरकार सरकारची बाजू मांडत असून विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात (supreme court) जावं, असा सल्ला दिल्यामुळे आंदोलक नाराज झाले होते. त्यानंतर पुन्हा आंदोलकांचे वकील आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीतूनही तोडगा निघाला नाही.  

नव्या सरकारकडून आम्हाला अपेक्षा होत्या. परंतु हे सरकारही काही ठोस निर्णय घेईल, असं वाटत नाही. केवळ ५ विद्यार्थ्यांसाठी साडेतीन हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्यात ३५ हजार जागा खाली असताना या रिकाम्या जागांवर उमेदवार भरायला सरकार तयार नाही. किमान ११ महिन्याच्या करारावर विद्यार्थ्यांना नोकरीत सामावून घ्या, अशी मागणी करूनही सरकारने ही गोष्ट मान्य केली नाही. इथले अधिकारी नकारात्मक पद्धतीने काम करत आहेत, अशी टीका आंदोलनकर्त्यांनी केली होती. 

हेही वाचा- जिभेला लगाम घाला, संभाजीराजे राऊतांवर भडकले

यावर बोलताना संभाजीराजे (bjp mp sambhajiraje bhonsale) म्हणाले की, विषय गढूळ करायचा नव्हता म्हणून मी महिनाभर इथे आलो नाही. पण ३५ दिवस आंदोलन करुनही पर्याय निघत नसल्याने नाईलाजास्तव यावं लागलं. सरकार हे मुख्यमंत्र्यांनी चालवायचं असतं अधिकाऱ्यांनी नाही. मराठा समाजाला बाजूला ठेवू नका. केवळ अधिकाऱ्यांच्या बाबूगिरीमुळे साडेतीन हजार तरुणांचं भवितव्य धोक्यात आलं आहे. आंदोलकर्त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट लवकरच घालून देऊ, असंही ते म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा