Advertisement

शिवसेनेला 'इतकी' खाती देण्याची भाजपाची तयारी

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून भाजपा आणि शिवसेनेतील वाद चांगलाच पेटल्याने अद्याप सत्ता स्थापनेबाबत कोणतीच पावलं उचलली गेली नाहीत.

शिवसेनेला 'इतकी' खाती देण्याची भाजपाची तयारी
SHARES

भाजपा आणि शिवसेनेतील सत्ता संघर्ष चांगलाच उफाळल्याने सत्ता वाटपाचा पेच काही सुटण्याची चिन्हं दिसत नाहीत. आता भाजपाने शिवसेनेला १६ मंत्रीपदांची आॅफर दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामध्ये मुख्यमंत्री पदाची मागणी मात्र भाजपाने मान्य केलेली नाही. आता शिवसेना यावर काय निर्णय घेते आणि हा पेच कसा सोडवते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून भाजपा आणि शिवसेनेतील वाद चांगलाच पेटल्याने अद्याप सत्ता स्थापनेबाबत कोणतीच पावलं उचलली गेली नाहीत. शिवसेनेने अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. याच मुद्यावर दोन्ही पक्षांची चर्चा अडली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदावर दावा सांगत आहेत. 

सुत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेला गृह, अर्थ, नगरविकास, महसूल आदी महत्वाच्या खात्यांसह एकूण १७ खाती हवी आहेत. मात्र. आता भाजपाने १६ मंत्रीपदे देऊ केली आहेत. महसूल खातंही सोडण्याचीही तयारी भाजपाने दाखवली आहे. भाजपाच्या या प्रस्तावामुळे सत्तास्थापनेची कोंडी फुटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 



हेही वाचा -

सत्तासमीकरणावर मुख्यमंत्र्यांचं ‘नो कमेंट’, ‘युती’ वर बोलण्याचंही टाळलं

भाजपची नमती भूमिका, शिवसेनेला गृह, महसूल खातं देणार?




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा