Advertisement

खडसेंचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती- महाजन

भूखंड गैरव्यवहार प्रकरणात नाव आल्याने मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले खडसे यांच्या हातचं महसूल खातंही गेलं. यामुळे चक्क २ वर्षांहून अधिक काळ त्यांना मंत्रीपदापासून दूर राहावं लागलं. एका बाजूला भाजपाचे लहानमोठे सर्वच नेते सत्तेचा उपभोग घेत असताना, भाजपाचा ज्येष्ठ नेता प्रवाहाबाहेर फेकला गेल्याने त्यांच्या पाठिराख्यांमध्येही नाराजी पसरली. खडसे पुन्हा मंत्रीमंडळात परतल्यास ही नाराजी काही अंशी दूर होऊ शकते.

खडसेंचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती- महाजन
SHARES

पुण्याच्या भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिल्यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा तर मिळाला आहेत. पण राज्य मंत्रिमंडळात परतण्याचा त्यांचा मार्गही मोकळा झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 'खडसे यांचा मंत्रीमंडळातील समावेशाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील' असं म्हणून या चर्चेत भर घातली आहे.

मंत्रीपदापासून २ वर्षे दूर

भूखंड गैरव्यवहार प्रकरणात नाव आल्याने मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले खडसे यांच्या हातचं महसूल खातंही गेलं. यामुळे चक्क २ वर्षांहून अधिक काळ त्यांना मंत्रीपदापासून दूर राहावं लागलं. एका बाजूला भाजपाचे लहानमोठे सर्वच नेते सत्तेचा उपभोग घेत असताना, भाजपाचा ज्येष्ठ नेता प्रवाहाबाहेर फेकला गेल्याने त्यांच्या पाठिराख्यांमध्येही नाराजी पसरली. खडसे पुन्हा मंत्रीमंडळात परतल्यास ही नाराजी काही अंशी दूर होऊ शकते.

काय म्हणाले महाजन?

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील सख्य संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यातच एका कार्यक्रमात मत व्यक्त करताना महाजन म्हणाले, ''एकनाथ खडसे यांना न्यायालयाकडून क्लीन चीट मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाचा मार्ग मोकळा होईल. त्यांच्या अनुभवाचा फायदा सरकारला नक्कीच होईल. पण त्यांचा मंत्रीमंडळ समावेशाचा निर्णय खुद्द मुख्यमंत्रीच घेतील.''

'असा' ही योगायोग

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ एकनाथ खडसे https://www.mumbailive.com/mr/politics/not-interested-to-join-any-political-party-and-all-twitter-post-is-fake-says-bjp-senior-leader-eknath-khadse-22240यांना क्लीन चीट मिळाल्याने दोन मातब्बर नेते पुन्हा एकदा एकाच वेळेत महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय होतील अशी चिन्हे आहेत.

खडसे यांच्या राजकीय भवितव्यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा-

मी भाजपमध्येच राहणार- खडसे

मंत्रालयात सापडले ३ लाख उंदीर!

लोकप्रतिनिधींची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई का नाही?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा