Advertisement

शिवसेना असो वा नसो, कामाला लागा, मुख्यमंत्र्यांचं कार्यकर्त्यांना अावाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पार पडलेल्या भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आता 'एकला चलो रे' हा सूर आळवला आहे. सेना सोबत असो वा नसो, निवडणुकीच्या तयारीला लागा, असे स्पष्ट आदेशच मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

शिवसेना असो वा नसो, कामाला लागा,  मुख्यमंत्र्यांचं कार्यकर्त्यांना अावाहन
SHARES

लोकसभा-विधानसभा जवळ येत असल्यानं रुसलेल्या मित्रपक्ष शिवसेनेला गोंजरण्याचं काम भाजपाकडून सुरू असतानाच आता भाजपानं यू-टर्न घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पार पडलेल्या भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आता 'एकला चलो रे' हा सूर आळवला आहे. सेना सोबत असो वा नसो, निवडणुकीच्या तयारीला लागा, असे स्पष्ट आदेशच मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांना देत निडवणुकीच्या तयारीचा श्रीगणेशा केला आहे.
तयारीला लागा

सध्या भाजप अाणि सत्तेत असलेला मित्रपक्ष शिवसेना यांच्यात कुरघोडी करण्याचं राजकारण सुरू असलं तरी सेना सत्तेतून बाहेर पडलेली नाही. सेनेनं स्वबळाची भाषा करत भाजपासमोरच आव्हान निर्माण केलं आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुका हे त्याचच द्योतक होत. असं असलं तरी भाजपाकडून मात्र सेनेला गोंजरण्याचे प्रयत्न सुरूच होते. सोमवारी मात्र मुख्यमंत्र्यांनी सेना एकत्र येवो ना येवो निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश दिले.'शिवसेनेशिवायही जिंकू'

पालघर लोकसभा पोटनिवडणtक स्वबळावर जिंकत भाजपानं दाखवून दिलं, की आम्ही स्वबळावर निवडून येऊ शकतो. याच आत्मविश्वासाच्या जोरावर मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितलं आहे. दरम्यान, स्वबळाची भाषा करणाऱ्या सेनेला गोंजारण्याचे प्रयत्न जरा बाजुला सारत आता भाजपानंही स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी दर्शवली आहे.स्वबळावर लढण्यास तयार- दानवे

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला, समविचारी मित्रपक्षांना एकत्र घेण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, सुरू राहिल. मात्र युती ही एका बाजुनं होत नाही तर सेनेनंही त्यासाठी प्रतिसाद द्यायला हवा. जर सेनेनं प्रतिसाद दिला नाही तर आम्ही स्वबळावर लढायला तयार असल्याचं म्हणत दानवे यांनीही मुख्यमंत्र्यांचा 'एकला चलो रे'चा कित्ता गिरवला आहे. अाता भाजपाची ही नवी भूमिकी लक्षात घेता, शिवसेनेची काय प्रतिक्रिया असेल हेही पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.


हेही वाचा -

साम, दाम, दंड, भेदानंतर मुख्यमंत्र्यांचीही युतीला साद

म्हणून तावडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा