Advertisement

केजरीवालांचं कौतुक पडलं महागात, काँग्रेस नेत्यांनी काढली मिलिंद देवरांची खरडपट्टी

मिलिंद देवरांनी केजरीवाल यांचं केलेलं कौतुक काँग्रेसच्या (congress) काही नेत्यांना न आवडल्याने त्यांनी देवरांची सोशल मीडियावरून चांगलीच खरडपट्टी काढली.

केजरीवालांचं कौतुक पडलं महागात, काँग्रेस नेत्यांनी काढली मिलिंद देवरांची खरडपट्टी
SHARES

दिल्ली विधानसभेच्या (Delhi vidhan sabha election 2020) नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने (aam aadmi party) दणदणीत विजय मिळवत भाजपला (bjp) सपशेल धोबीपछाड दिली. यानंतर भाजप विरोधी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपचे प्रमुख मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांचं तोंडभरून कौतुक केलं. त्यात काँग्रेस नेते मिलिंद देवरा (milind deora) देखील सामील होते. परंतु देवरांनी केजरीवाल यांचं केलेलं कौतुक काँग्रेसच्या (congress) काही नेत्यांना न आवडल्याने त्यांनी देवरांची सोशल मीडियावरून चांगलीच खरडपट्टी काढली.

हेही वाचा- भाजपचं सरकारविरोधात २५ फेब्रुवारीला राज्यव्यापी आंदोलन

दिल्ली विधानसभेच्या (Delhi vidhan sabha election 2020) निकालांत आपने स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर देवरा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून केजरीवाल (arvind kejriwal) यांच्या भाषणाचा व्हिडीओ ट्विट केला. त्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारने मागच्या ५ वर्षांत राज्याचा महसूल दुपटीने वाढवला. आर्थिक तारतम्य बाळगणाऱ्या राज्यांच्या यादीत दिल्लीचा क्रमांक वरचा असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. हे कौतुक काँग्रेसच्या नेत्यांच्या पसंतीस उतरलं नाही. त्यामुळे देवरा यांना काँग्रेस सोडायची असेल तर त्यांनी जरूर सोडावी, पण अर्धवट माहितीवरून आपचं कौतुक करू नका, अशा शब्दांत काँग्रेस नेत्यांनी देवरा (milind deora) यांना टोला लगावला.

काँग्रेस नेते अजय माकन (ajay makan) यांनी देवरा यांचा समाचार घेताना म्हटले की, तुम्हाला काँग्रेस सोडायची असेल, तर जरूर सोडा. पण अर्धवट माहितीच्या आधारे आपचं कौतुक करू नका. हे सांगतानाच त्यांनी काँग्रेसच्या काळात झालेली महसूलवाढ आणि आपच्या काळातील महसूलवाढ यांची तुलना केली आहे. 

जनकपुरी विधानसभा मतदारसंघातील पराभूत काँग्रेस उमेदवार राधिका खेरा (radhika khera) यांनीही देवरा यांच्या ट्विटवर नापसंती व्यक्त केली. त्या म्हणाल्या, माझ्यासारख्या पक्षातील नव्या उमेदवाराला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रोसाहन मिळेल, अशी अपेक्षा असते. परंतु काँग्रेसचे वरिष्ठ नेते मात्र आपसारख्या पक्षाचं गुणगान करण्यात मश्गुल आहेत. शिला दिक्षित (shila dixit) यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीची कामगिरी दर्जेदार झाल्याचा दावाही त्यांनी केला. 

हेही वाचा- उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भास्कर जाधवांनी विनायक राऊतांना दिला धक्का

वडिलांच्या नावावर पक्षात यायचं, राजकीय वारशाच्या जोरावर निवडणुकीत उमेदवारी मिळवायची, पक्षाचे नेतृत्व स्वत:कडे असतानाही निवडणुकीत पराभूत व्हायचं. पण, जेव्हा पक्षासाठी संघर्ष करायची वेळ येते तेव्हा गिटार वाजवत बसायचं,’ असं ट्विट करत दिल्लीच्या नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्षा अलका लांबा (alka lamba) यांनीही देवरा यांना खडेबोल सुनावले.  


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा