Advertisement

कर्नाटकात बळकावलेलं मुख्यमंत्रीपद सोडावंच लागलं- राधाकृष्ण विखे पाटील

भाजपाने केवळ १०४ आमदारांची यादी दिली होती. तरीही राज्यपालांनी घेतलेल्या या निर्णयामुळे घोडेबाजाराला चालना मिळून लोकशाहीचे धिंडवडे निघणार होते. परंतु, सरतेशेवटी भाजपाचा घोडेबाजारही यशस्वी झाला नाही आणि येडीयुरप्पांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. या पार्श्वभूमीवर आता तेथील राज्यपालांना एक क्षणभरही पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचं विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं.

कर्नाटकात बळकावलेलं मुख्यमंत्रीपद सोडावंच लागलं- राधाकृष्ण विखे पाटील
SHARES

लोकशाही धाब्यावर बसवून बळकावलेलं कर्नाटकचं मुख्यमंत्री पद भाजपाला अखेर सोडावं लागलं असून, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी केलेल्या खटाटोपातून भाजपाचा लोकशाहीविरोधी चेहरा समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन देशभरातील राजकीय चित्र पालटणार असल्याचं विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी म्हटलं.


बहुमत नसतानाही...

कर्नाटकातील राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने बहुमतासाठी आवश्यक ११६ आमदारांची यादी राज्यपालांकडे सादर केली. परंतु, राज्यपालांनी घटनात्मक पद्धतीने निर्णय न घेता कागदावरसुद्धा बहुमत नसलेल्या भाजपाला सत्तास्थापनेची संधी दिली.


घोडेबाजाराला चालना

भाजपाने केवळ १०४ आमदारांची यादी दिली होती. तरीही राज्यपालांनी घेतलेल्या या निर्णयामुळे घोडेबाजाराला चालना मिळून लोकशाहीचे धिंडवडे निघणार होते. परंतु, सरतेशेवटी भाजपाचा घोडेबाजारही यशस्वी झाला नाही आणि येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. या पार्श्वभूमीवर आता तेथील राज्यपालांना एक क्षणभरही पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचं विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं.


घटनाक्रमाचे पडसाद

लोकशाहीच्या गप्पा करणाऱ्या भाजपाचा मुखवटा गळून पडला आहे. मागील दोन-तीन दिवसांत काँग्रेस आमदारांना लालूच देण्यासंदर्भात समोर आलेले फोन रेकॉर्डिंग्स, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून काँग्रेस आमदारांवर दबाव आणण्याचे झालेले प्रयत्न पाहता या संपूर्ण घटनाक्रमाचे पडसाद पुढील काळात भारताच्या कानाकोपऱ्यात उमटताना दिसतील, असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं.


अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

भाजपकडून घोडेबाजार आणि फोडाफोडीचं राजकारण सुरू होतं, मात्र शेवटी लोकशाहीचा विजय झाला. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने हा घोडेबाजर थांबला. मी न्यायालयाचे आभार मानतो येडियुरप्पा यांनी विधानसभेतून काढता पाय घेतला. बहुमत नव्हतं तरी नाटकं केली. राष्ट्रगीत सुरू असताना येडियुरप्पा आणि भाजप आमदार राष्ट्रगीताचा अवमान करून निघून गेले. त्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. 


हेही वाचा-

कर्नाटकात काँग्रेसचंच सरकार- अशोक चव्हाण

'मग बॅलेट पेपरने निवडणुका घेऊन दाखवा' - उद्धव ठाकरे



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा