Advertisement

“काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे”, नाना पटोलेंचा इशारा

“काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात ठेवा”, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राज्यातील महाविकास आघाडी सरकारला काँग्रेसच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.

“काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे”, नाना पटोलेंचा इशारा
SHARES

“काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात ठेवा”, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राज्यातील महाविकास आघाडी सरकारला काँग्रेसच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. सोबतच काँग्रेस (congress) आमदारांना निधी कमी मिळत असल्याच्या तक्रारीवरून नाना पटोले यांनी नाराजी देखील व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार काँग्रेस आमदारांना निधी कमी देत असल्याची तक्रार सातत्याने काँग्रेस आमदारांकडून केली जात आहे. त्यामुळे काँग्रेसला नजरेआड करू नका असा इशाराच नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्यातून सत्तेतील भागीदार शिवसेना (shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

हेही वाचा- हिंमत असेल तर अटक करून दाखवाच! मनसेचं सरकारला थेट आव्हान

महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर आहे, एखादी गोष्ट कमी मिळत असेल तर ती बोलल्यास चूक म्हणता येणार नाही. समान वाटप व्हावं इतकीच आमची अपेक्षा आहे, काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात असू द्या, असा इशाराच त्यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला (ncp) दिला.

त्याचसोबत विधानसभा अध्यक्षपदावर काँग्रेसचाच दावा असल्याचंही त्यांनी ठासून सांगितलं. विधानसभा अध्यक्षपदाची निवड बिनविरोध नेमण्याची राज्याची परंपरा आहे, ती सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून कायम ठेवावी, या संविधानिक पदाची निवड करताना कोणताही वाद होऊ नये ही आमची भूमिका असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितलं.

एकीकडे भाजप सरकार पेट्रोल-डिझेलवर अवाजवी अबकारी कर लावून जनतेला लूटत आहे. त्यातच रस्ते विकास सेसच्या नावाखाली १८ रुपये आणि कृषी सेसच्या नावाखाली ४ रुपये असे तब्बल २२ रुपये प्रति लिटर सेस पेट्रोल, डिझेलवर आकारून दोन्ही हाताने जनतेची लूट सुरु केली आहे. तेव्हा केंद्रातील मोदी सरकारने एक तर रस्ते विकास सेस बंद करावा किंवा देशभरातील टोल बंद करावेत, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.

(congress maharashtra president nana patole slams ncp and shiv sena on mla fund distribution)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा