Advertisement

काँग्रेसला पलटवार देण्यासाठी भाजपाच्या देशभरात ७० पत्रकार परिषदा- निर्मला सीतारमन

काँग्रेसवर पलटवार करण्यासाठी देशातल्या ७० शहरांमध्ये भाजपाकडून पत्रकार परिषदा घेण्यात येणार आहेत. या पत्रकार परिषदेला त्या त्या राज्यातील मुख्यमंत्री आणि केंद्रातील बड्यात नेत्याची हजेरी असणार आहे.

काँग्रेसला पलटवार देण्यासाठी भाजपाच्या देशभरात ७० पत्रकार परिषदा- निर्मला सीतारमन
SHARES

राफेल विमान खरेदी व्यवहारांत घोटाळा झाल्याचा खोटा आरोप करत काँग्रेसने जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे जेपीसीच्या चौकशीची मागणी ही निव्वळ राजकीय हेतूनं होत असल्याचं म्हणत केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी याप्रकरणी काँग्रेसचा पर्दाफाश करणार असल्याचं सांगितलं आहे. राफेलप्रकरणी काँग्रेसकडून कशा रितीने खोटा प्रचार करण्यात येत आहे, हे जनतेसमोर मांडण्यासाठी भाजपाने देशभरात ७० पत्रकार परिषदांचं आयोजन केलं आहे. यापैकी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत बोलताना सीतारमन यांनी हे वक्तव्य केलं.


इतर मुद्दाच नाही

राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला नुकताच मोठा दिलासा दिला आहे. त्यानंतरही काँग्रेसकडून राफेलविरोधात खोटा प्रचार सुरू असल्याचा आरोप सीतारामन यांनी केला. काँग्रेसकडे सध्या भाजपाला लक्ष्य करण्याव्यतीरिक्त इतर कोणताच मुद्दा नसल्यानं काँग्रेस राफेल घोटाळ्याचं नाव पुढं करत जनतेची दिशाभूल करत आहे. खरं तर काँग्रेसच्या काळात संरक्षण खेरदीत मोठा भ्रष्टाचार झाला होता, हे काँग्रेस सोयीस्कररित्या विसरल्याचंही त्या म्हणाल्या. राफेलच्या किंमती कॅगकडे देण्यात आल्या असून कॅगचा अहवाल लवकरच 'पीएसी'कडे सादर होईल, अशी महितीही त्यांनी यावेळी दिली.


७० पत्रकार परिषदा

काँग्रेसवर पलटवार करण्यासाठी देशातल्या ७० शहरांमध्ये भाजपाकडून पत्रकार परिषदा घेण्यात येणार आहेत. या पत्रकार परिषदेला त्या त्या राज्यातील मुख्यमंत्री आणि केंद्रातील बड्यात नेत्याची हजेरी असणार आहे. योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, विजय रूपानी, सर्वानंद सोनोवाल या मुख्यमंत्र्यांसह निर्मला सितारामन, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, जेपी नड्डा, स्मृती इराणी, सुरेश प्रभू, शिवराज सिंह चौहान यांच्याकडून पत्रकार परिषदा घेतल्या जाणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.



हेही वाचा-

राफेलप्रकरणी केंद्राने न्यायालयाला चुकीची माहिती दिली- पवार

सरकारने न्यायालयाला फसवलं? की न्यायालयाने देशाला? - उद्धव ठाकरे



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा