Advertisement

दुष्काळसदृश नाही दुष्काळ जाहीर करा - अशोक चव्हाण

खरीपाची पिकं वाया गेली आहेत. रब्बीची पेरणीही झालेली नाही. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. जनावरांना चारा नाही. असं असताना सरकारला मात्र ही परिस्थिती दुष्काळसदृश कशी दिसते, असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.

दुष्काळसदृश नाही दुष्काळ जाहीर करा - अशोक चव्हाण
SHARES

मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश असल्याचं जाहीर केलं आहे. तर या दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी या १८० तालुक्यांसाठी ८ सुत्री कार्यक्रमाची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. असं असताना काँग्रेसनं मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली अाहे. दुष्काळ असताना दुष्काळसदृश म्हणणं ही जनतेची फसवणूक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळं दुष्काळसदृश नव्हे तर दुष्काळ जाहीर करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. गांधीभवन येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


चारा छावण्या सुरू करा

मराठवाड्यासह राज्यातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये यंदा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीपाची पिकं वाया गेली आहेत. रब्बीची पेरणीही झालेली नाही. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. जनावरांना चारा नाही. असं असताना सरकारला मात्र ही परिस्थिती दुष्काळसदृश कशी दिसते, असा सवाल चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळं  दुष्काळसदृश नव्हे तर दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. दुष्काळ जाहीर करत सरकारने त्वरीत चारा छावण्या आणि टँकरने पाणी पुरवठा सुरू करावा, अशीही मागणी चव्हाण यांनी केली आहे. 


जलयुक्त शिवार घोटाळा

जलयुक्त शिवाराच्या नावाखाली सरकारनं कोट्यवधी रूपये खर्च केले तरी राज्यात भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळं जलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे असा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, काँग्रेस जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून राज्य पिंजून काढत असून या यात्रेचा तिसरा टप्पा बुधवारी २४ आॅक्टोबरला तुळजापूर येथून सुरू होणार असल्याचंही त्यांना सांगितलं आहे. या यात्रेद्वारे काँग्रेसकडून मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करण्यात येणार असून काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. 



हेही वाचा - 

राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश; मुख्यमंत्र्यांची घोषणा

रक्ताने माखलेलं सॅनिटरी पॅड मित्राच्या घरी न्याल का? स्मृती इराणी यांचं वादग्रस्त वक्तव्य

२०१९ मध्ये भाजपाची सत्ता जाणार- पवार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा