Advertisement

ती व्यक्ती मुलींसाठी धोकादायक! काँग्रेसचा कंगनाला सल्ला

ती व्यक्ती मुलींसाठी धोकादायक आहे! असं म्हणत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणारी अभिनेत्री कंगना राणावत टोला हाणला आहे.

ती व्यक्ती मुलींसाठी धोकादायक! काँग्रेसचा कंगनाला सल्ला
SHARES

तुम्ही ज्या व्यक्तीला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद देत आहात, त्या व्यक्तीशी जपून राहण्याची गरज आहे. कारण ती व्यक्ती मुलींसाठी धोकादायक आहे! असं म्हणत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणारी अभिनेत्री कंगना राणावत टोला हाणला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनची चर्चा सुरू झाल्यानंतर बॉलिवूड आणि ड्रग माफिया यांच्यातील संबंध चव्हाट्यावर आणण्याची तयारी कंगना राणावत हिनं दाखवली होती. त्यावर कंगनाला संरक्षणाची गरज आहे. मात्र, तिनं माहिती देण्याची तयारी दाखवून ४ दिवस उलटूही महाराष्ट्र सरकारनं तिला संरक्षण दिलेलं नाही, असं म्हणत भाजप आमदार कदम यांनी कंगनाला संरक्षण देण्याची मागणी केली होती. 

हेही वाचा - “आदित्यला वाचवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसवाले पगारावर ठेवले”

त्यावर प्रतिक्रिया देताना सर…माझ्या काळजीसाठी धन्यवाद. खरंतर गुंड आणि मुव्ही माफियांपेक्षा मला आता मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकारची किंवा थेट केंद्राची सुरक्षा हवी आहे. मुंबई पोलिसांची नको, प्लीज, असं म्हणत कंगनानं राम कदम यांचे आभार मानले होते.

या संभाषणावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी कंगनाचे कान उपटले आहेत. कंगना, तू ज्याचे आभार मानतेस, त्याच व्यक्तीपासूनच तुला खरी भीती आहे. तू जपून राहायला हवं. कारण ती व्यक्ती मुलींच्या बाबतीत धोकादायक आहे, असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.

घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात भाषण करताना राम कदम यांनी मुलींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्याचाच आधार घेऊन सचिन सावंत यांनी कंगनाला सल्ला दिला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा