Advertisement

सुशांत सिंह प्रकरणाला अवास्तव प्रसिद्धी, अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाचा अहवाल

महाराष्ट्राची बदनामी करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्या प्रचाराला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जाणार का? असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

सुशांत सिंह प्रकरणाला अवास्तव प्रसिद्धी, अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाचा अहवाल
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला जाणीवपूर्वक बदनाम केलं. अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाचा अहवालही हेच सांगतो. यामुळे आता भाजपने राज्यातील जनतेची माफी मागावी. महाराष्ट्राची बदनामी करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्या प्रचाराला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जाणार का? असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. (conspiracy of bjp to defamat mumbai police through sushant singh rajput suicide case says anil deshmukh)

मुंबईतील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनिल देशमुख यांनी सांगितलं की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा अभ्यास करून त्याचा एक अहवाल अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाने नुकताच जारी केला आहे. या अहवालात सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला अवास्तव प्रसिद्धी देण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामध्ये अनेक वृत्तवाहिन्यांची नावं देखील आहेत. एका राजकीय पक्षाने हे पूर्ण प्रकरण एका वेगळ्याच दिशेने नेलं, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला जाणीवपूर्वक बदनाम करण्यात आलं. 

हेही वाचा - हा तर मुंबई पोलिसांच्या बदनामीचा कट- संजय राऊत

या पक्षाने सुपारी घेतल्यासारखं काम केलं. महाराष्ट्राच्या अस्मितेला शिव्याशाप देण्याचं काम केलं. एवढंच नाही, तर महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं कामही गेल्या काही महिन्यात करण्यात आलं. महाराष्ट्र पोलिसांना माफीया म्हणण्यापर्यंत काही भाजपच्या नेत्यांची मजल गेली होती. याउलट सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात मुंबई पोलिसांनी अतिशय योग्य दिशेने आणि प्रोफेशनली तपास केल्याचं नमूद केलं आहे, असं अनिल देशमुख म्हणाले.

त्यातही अतिशय दु:खद गोष्ट आहे की, ज्यांनी महाराष्ट्राचं ५ वर्षे नेतृत्व केलं. महाराष्ट्र पोलिसांचं नेतृत्व केलं, अशा देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत याप्रकरणी योग्य तपास न झाल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भाजपने याप्रकरणी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्राची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही. शिवाय बिहारचे प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी करणारे गुप्तेश्वर पांडे यांच्या प्रचाराला जाणार का? असा प्रश्न देखील अनिल देशमुख यांनी विचारला आहे.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा