Advertisement

विद्यार्थ्यांना एसटीने मोफत घरी सोडा, देवेंद्र फडणवीस यांची मागणी

ठिकठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

विद्यार्थ्यांना एसटीने मोफत घरी सोडा, देवेंद्र फडणवीस यांची मागणी
SHARES

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अडकून पडलेल्या लोकांकडून त्यांना घरी सोडण्यासाठी शुल्क आकारायचे की नाहीत? यावरून गोंधळ झाल्याने परिवहन विभागाने तूर्तास जिल्हांतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (msrtc) एसटी बस (free st bus) चालवण्याचा निर्णय स्थगित केला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

हेही वाचा - ‘मुंबईला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचा प्रयत्न’

ज्या लोकांना आपापल्या गावी जायचं आहे, त्यांच्यासंदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानग्या मागितल्या होत्या. परंतु मुंबईतून (mumbai) येणाऱ्या माणसांमुळे गावी देखील कोरोना येईल, अशा अफवा परलेल्या असल्याने गावकरी मुंबईकरांना विरोध करत आहेत. रेड झोनमधील लोकांना इतर जिल्ह्यात (inter district bus service) पाठवू नका अशा तक्रार आल्या आहेत किंवा येत आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा एसटी बस सुरू करण्याचा निर्णय तूर्तास थांबवलेला आहे. त्यामुळे आंतरजिल्हा एसटी बस सेवा सुरू करायची असल्यास ती टप्प्याटप्प्यानेच सुरू करावी लागेल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती. 

यामुळे राज्याच्या विविध जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, मजूर, पर्यटक, इतर प्रवासी अशा सगळ्यांच्याच अपेक्षांवर पाणी फेरलं गेलंय. केवळ परप्रांतीय मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठीच सध्या तरी एसटी ची बससेवा सुरू आहे. यामुळे इतर लोकं आपली नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

यासंदर्भात भाष्य करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास इच्छुक परप्रांतीय मजुरांना एसटीची मोफत सेवा देण्यात यावी. त्याच सोबत राज्यातील विविध शहरांमध्ये अडकून पडलेले विद्यार्थी तसंच राज्याबाहेरून येणारे विद्यार्थी अशा सर्वांनाच त्यांच्या गावी परत जाण्यासाठी एसटीची मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

हेही वाचा - मला अनेक पक्षांकडून आॅफर- एकनाथ खडसे


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा