Advertisement

भूमिपुत्रांनो, नोकरीसाठी तयार व्हा! महाराष्ट्रात कामगार ब्युरोची लवकरच स्थापना

महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांमध्ये कामगारांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून राज्यात कामगार ब्युरोची स्थापना करण्यात येणार आहे.

भूमिपुत्रांनो, नोकरीसाठी तयार व्हा! महाराष्ट्रात कामगार ब्युरोची लवकरच स्थापना
SHARES

महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांमध्ये (industries in maharashtra) कामगारांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या (skill development department) माध्यमातून राज्यात कामगार ब्युरोची (labor beuro) स्थापना करण्यात येणार आहे. कामगार ब्युरोतर्फे राज्यातील उद्योगधंद्यांना कुशल आणि अकुशल मनुष्यबळ पुरवण्यात (skill and unskilled labor ) येईल. भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य देण्यात येणार असल्याने स्थानिक तरूणांना याचा मोठा फायदा होईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (industries minister subhash desai) यांनी दिली.

लाॅकडाऊनमुळे हाल

कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर देशव्यापी लाॅकडाऊन (lockdown) करण्यात आला आहे. या लाॅकडाऊनमुळे केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर इतर राज्यांतील उद्योगधंदे देखील बंद पडलेत, उत्पादन ठप्प झालं आहे. यामुळे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचा (migrant labor) रोजगार बुडाला आहे. यामुळे प्रामुख्याने हातावर पोट असणाऱ्या, रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे चांगलेच हाल होत आहेत. स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था आदी माध्यमातून कामगारांची दोन वेळची खाण्यापिण्याची सोय होत असली, तरी खिशात पैसे नसल्याने इतर गरजा भागवताना त्यांची मोठी अडचण होत आहे. 

हेही वाचा - राज्यातील ३५ हजार कारखान्यांत उत्पादन सुरू, ९ लाख कामगार कामावर रूजू

गावी परतण्याचा निर्णय

कोरोना संकट आणि वाढत असलेला लाॅकडाऊन हे सारंकाही अनिश्चितकालीन असल्याने बहुतांश मजूर, कामगारांनी आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातही परप्रांतीयांची संख्या २० ते ३० लाखांच्या घरात आहे. हे मजूर जमेल त्या पद्धतीने राज्याबाहेर जात आहेत. लाॅकडाऊन उठवण्यात आल्यानंतर ज्या उद्योगधंद्यांमध्ये हे मजूर कार्यरत होते. तिथं या कामगारांची कमतरता भासू शकते, हे लक्षात ठेवूनच कामगार ब्युरो तयार करण्यात आला आहे.  

संधी सोडू नका

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र सोडून जाऊ नका, आहे तिथंच राहा, असं मागील महिनाभर सांगूनही परप्रांतीय कामगार आपापल्या गावी परतत आहेत. या मजुरांच्या निघून जाण्यामुळे राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांसाठी आता रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. नोकरीच्या संधीसाठी अनेकदा आंदोलने करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांनी ही सुवर्णसंधी सोडू नये. या सर्वांना रोजगारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठीच राज्यात कामगार ब्युरोची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रात उद्योगधंदे चालवणाऱ्या मालकांनी देखील जास्तीत जास्त स्थानिक भूमिपुत्रांना संधी द्यावी. महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी होईल, अशी अपेक्षा सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.

कामगार ब्युरो अंतर्गत कामगारांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे विभागलं जाईल. त्यानंतर, अवघ्या ७ दिवसांत कामगारांना प्रशिक्षण देऊन उद्योगधंद्यांच्या गरजेनुसार कामगार पुरवले जातील. त्यामुळे कंपन्या, कारखान्यांना मोठ्या प्रमाणात कुशल, अकुशल मजूर, कामगार उपलब्ध होतील.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा