Advertisement

दारू विकत घेणाऱ्यांचं रेशनकार्ड रद्द करा, इम्तियाज जलील यांची मागणी

जे लाेकं लाॅकडाऊनच्या काळात दारू विकत घेऊ शकतात, ते अन्नधान्य देखील नक्कीच विकत घेऊ शकतात, त्यामुळे वाईन शाॅप बाहेर रांगा लावून दारू विकत घेणाऱ्या सगळ्यांचं रेशन कार्ड रद्द करा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

दारू विकत घेणाऱ्यांचं रेशनकार्ड रद्द करा, इम्तियाज जलील यांची मागणी
SHARES

जे लाेकं लाॅकडाऊनच्या काळात दारू विकत घेऊ शकतात, ते अन्नधान्य देखील नक्कीच विकत घेऊ शकतात, त्यामुळे वाईन शाॅप बाहेर रांगा लावून दारू विकत घेणाऱ्या सगळ्यांचं रेशन कार्ड रद्द करा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याआधी देखील जलील यांनी वाईन शाॅप सुरू करण्यास परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला होता.

वाईन शाॅपबाहेर गर्दी 

यावर भाष्य करताना इम्तियाज जलील म्हणाले, दारूची दुकानं सुरू केल्यानंतर काय घडू शकतं हा मी लावलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला. मुंबईत दारूची दुकानं उघडल्यानंतर दुकानांबाहेर इतकी गर्दी उसळली की सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाला. या २ दिवसांत राज्यभरात किती जणांना आरोग्याच्या दृष्टीने फटका बसला, असेल काय माहीत. म्हणूनच आम्ही औरंगाबादमध्येही दारूची दुकानं सुरू करू दिली नाही.

हेही वाचा - मुंबईतील दारूची दुकाने बंद, गर्दी उसळल्याने पालिका आयुक्तांचे आदेश

ते बेवडे असावेत

'उद्धव ठाकरे यांच्या चांगल्या कामाचं आम्ही देखील कौतुक करत होतो. पण आता ते सगळं व्यर्थ गेलं आहे. या निर्णयाबद्दल सरकारचा निषेध. रेड झोनमधील इतर आमदार, खासदार या मृत्यूच्या खेळाला आमंत्रण का देत आहेत? कदाचित ते देखील 'बेवडे' असावेत. ज्या लोकांकडे वाईन शाॅप बाहेर रांगा लावून दारू खरेदी करायला पैसे आहेत, ते अन्नधान्य देखील विकत घेऊ शकतात. त्यामुळे त्यांचं रेशन कार्ड सरकारने ताबडतोब रद्द करावं, अशी विनंती जलील यांनी सरकारला केली आहे.

पोलिसांना डोकेदुखी

कोरोना व्हायरसा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे राज्याचा आर्थिक गाडा चिखलात रूतून बसला आहे. तो हळुहळू बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारने ग्रीन आणि आॅरेंज झोनमधील उद्योगधंदे आणि दुकानं सुरू करायला परवानगी दिली. तसंच अटी व शर्थींच्या आधारे दारू विक्रीला परवानगी दिली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच तळीरामांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर बसवत वाईन शाॅपच्या बाहेर रांगा लावून दारू विकत घेतली. ही गर्दी इतकी वाढली की, पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवणंही कठीण होऊन बसलं. 

हेही वाचा - अवैध दारू विक्रीप्रकरणी राज्यभरात 4635 गुन्ह्यांची नोंद, तर इतक्या कोटीचा माल जप्त...

आयुक्तांचा निर्णय

ही बाब गांभीर्याने घेऊन मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी रात्री उशिरा एक आदेश काढून मुंबईत जीवनावश्यक वस्तू व औषधांची दुकाने सोडून अन्य अनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास मनाई केली. या आदेशानुसार दारूची दुकाने उघडण्यासही मनाई करण्यात आली. 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा