Advertisement

ठरलं! 'या' ठिकाणी होणार शिवसेनेचा दसरा मेळावा

यंदाच्या वर्षी मात्र ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइन पद्धतीनं हा दसरा मेळावा होणार आहे.

ठरलं! 'या' ठिकाणी होणार शिवसेनेचा दसरा मेळावा
SHARES

दरवर्षी विजयादशमी दिवशी म्हणजे दसऱ्याला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित राहतात. मात्र करोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी हा मेळावा ऑनलाइन पद्धतीने भरवण्यात आला होता. यंदाच्या वर्षी मात्र ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइन पद्धतीनं हा दसरा मेळावा होणार आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या अगोदरच दसरा मेळावा ऑफलाइन होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, हा दसरा मेळावा कुठे होणार? याबाबत स्पष्टता नव्हती. परंतू, आता जागा निश्चित करण्यात आली आहे. 

दसरा मेळाव्याच्या जागेबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये ५० टक्के उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मुंबईतले काही नगरसेवक, आमदार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, उपनेते तसंच महापौर उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क मैदानावर यापूर्वीचे दसरा मेळावे होत असत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी हा दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने साजरा झाला. तर यावर्षी हॉलमध्ये ५० टक्के उपस्थितीत हा मेळावा साजरा होणार आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा हा पक्षापुरता मर्यादित नसून त्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेलं असतं. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं असतं.



हेही वाचा -

मुंबईत बेस्टची बस सेवा बंद, महाराष्ट्र बंदचा परिणाम

Maharashtra Bandh : काँग्रेस, शिवसेना आणि NCPची प्रदर्शनं, भाजप, मनसेचा विरोध


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा