Advertisement

मुंबईतील कुठल्या रुग्णालयांत किती खाटा? लोकांच्या माहितीसाठी डॅशबोर्ड बनवा- देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारने तत्काळ एक डॅशबोर्ड तयार करून रुग्णालयातील उपलब्धता सांगितली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

मुंबईतील कुठल्या रुग्णालयांत किती खाटा? लोकांच्या माहितीसाठी डॅशबोर्ड बनवा- देवेंद्र फडणवीस
SHARES

मुंबईतील कुठल्या रूग्णालयांत किती खाटा उपलब्ध आहेत? (beds in mumbai hospitals) याची माहिती सगळ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी ताबडतोब एक डॅशबोर्ड (dashboard) तयार करण्यात यावा, अशी विनंती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (bjp leader devendra fadnavis) यांनी राज्य सरकारला केली आहे. जेणेकरून खाटा उपलब्ध नसल्याच्या कारणावरून कुठल्याही रुग्णाला उपचार नाकारण्यात येणार नाही. 

रुग्णाचे हाल

कोरोना संशयित (covid-19) रुग्ण असो किंवा इतर आजाराचे रुग्ण असोत कुठल्याही खासगी किंवा सरकारी रुग्णालयात गेल्यास तिथं खाटा (hospital beds) उपलब्ध नसल्याचं कारण देत रुग्णाला इतर ठिणाही जाण्याचा सल्ला दिला जातो किंवा उपचार टाळण्यात येतात. अशावेळेस गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णाच्या जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित होतो. कोरोना व्हायरस (coronavirus) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना सातत्याने असे कटू अनुभव येत आहेत. त्याची दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी

यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला कोणत्याही रूग्णालयात दाखल करून घेतलं जात नाही आणि रुग्णाला घेऊन इकडून तिकडे केवळ भटकावं लागतं, अशा स्वरूपाचे दूरध्वनी मला मुंबईतील असंख्य रूग्णांच्या नातेवाईकांकडून येत आहेत. राज्य सरकारने तत्काळ एक डॅशबोर्ड तयार करून रुग्णालयातील उपलब्धता सांगितली पाहिजे.  

हेही वाचा - हे आघाडी सरकार की वाधवान सरकार?, देवेंद्र फडणवीसांचा सवाल

आॅनलाईन पद्धत

रूग्णालयातील खाटांची ही उपलब्धता सार्वजनिकपणे लोकांना कळेल, अशापद्धतीने ऑनलाईन स्वरूपात असावी. जेणेकरून रूग्णांना आपल्याला कोणत्या रूग्णालयात जाऊन उपचार घ्यायचे आहेत, हे आधीच कळू शकेल आणि ते त्याच रूग्णालयात जातील. यामुळे त्यांची परवड थांबेल, असं फडणवीस म्हणाले. 

खासगी रुग्णालयांची टाळाटाळ

याआधी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील या मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे. खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करणं तर दूरच परंतु त्यांना रुग्णालयांतच दाखल करून घेण्यात येत नाही, असा आरोप सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. एवढंच नाही तर त्यांनी यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र देखील लिहिलं होतं. 

माझ्याकडे मदतीसाठी आलेल्या ४ रुग्णांना मी आणि डाॅक्टरांनी ६ खासगी रुग्णालयांत दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु एकाही रुग्णालयांत त्यांना दाखल करून घेतलं नाही. यातील दोघेजण मुलूंड आणि दोघेजण सायनचे होते. रुग्णालयातील सगळे बेड भरलेले असल्याने कोरोनाबाधितांना दाखल करून घेता येणार नाही, असं उत्तर त्यांनी दिल्याचं सोमय्यांनी सांगितलं.  

हेही वाचा - Video: ठाकरे सरकारचे पोलीस कुठे गेले? गोवंडीतील शिवाजी नगरमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा उडतोय फज्जा 


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा