Advertisement

मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या अचानक वाढली?

मुंबई महापालिकेतील काँग्रेस नगरसेविकेचं पद मुंबई लघुवाद न्याायालयाने रद्द केल्याने शिवसेनेच्या उमेदवार गीता भंडारी यांना नगरसेविका म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या अचानक वाढली?
SHARES

मुंबई महापालिकेतील काँग्रेस नगरसेविकेचं पद मुंबई लघुवाद न्याायालयाने रद्द केल्याने शिवसेनेच्या उमेदवार गीता भंडारी यांना नगरसेविका म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यामुळे महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकाने वाढली आहे.

दुसऱ्या क्रमांकाची मते

मालाडच्या मालवणी येथील वॉर्ड क्रमांक ३२ मध्ये २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मुंबई महापालिकेची निवडणूक झाली होती. मागासवर्गीय महिला आरक्षणानुसार या वाॅर्डात निवडणूक झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या स्टेफी किणी ६ हजार ७७५ मतांनी विजयी झाल्या होत्या. तर शिवसेनेच्या उमेदवार गीता भंडारी यांना ५ हजार ७६५ मते मिळाली होती.

न्यायालयात याचिका

दरम्यान स्टेफी यांच्या उमेदवारी अर्जातील कायदेशीर त्रुटी असल्याचं सांगत तसंच त्यांच्या जातीचा दाखलाही चुकीचा असल्याचं म्हणत भंडारी यांनी अॅड. चिंतामणी भणगोजी यांच्यामार्फत मुंबई लघुवाद न्याायालयात याचिका दाखल केली होती.

जातप्रमाणपत्र अवैध

ही याचिका प्रलंबित असतानाच जात पडताळणी समितीने स्टेफी यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं. त्याविरोधात स्टेफी यांनी याचिका केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने समितीच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मात्र, स्टेफी यांना नियमाप्रमाणे एक वर्षात जातवैधतेचा दाखला देता न आल्याने उच्च न्यायालयाने १८ डिसेंबर २०१८ रोजी स्थगिती उठवली. त्यानंतर मुंबई महापालिका आयुक्तांनी कायदेशीर प्रक्रिया करत स्टेफी यांना ७ जानेवारी २०१९ रोजी अपात्र घोषित केलं. तेव्हापासून वॉर्ड क्रमांक ३२ मधील नगरसेविका पद रिक्त होते.

किणी यांचा जातवैधतेचा दाखला अवैध असल्याचं स्पष्ट झाल्याने तसंच निवडणुकीवेळी भरलेल्या उमेदवारी अर्जातही त्रुटी असल्याचे सिद्ध झाल्याने मुंबई लघुवाद न्यायालयाने त्यांचं नगरसेवकपद रद्द करताना भंडारी यांना या वॉर्डमधील नगरसेविका म्हणून घोषित केलं. 



हेही वाचा-

१४ बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी, मुंबईच्या बंडखोरांचा समावेश नाही

विधानसभा निवडणूक: ८० कोटींचा मुद्देमाल भरारी पथकाकडून हस्तगत



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा