SHARE

एमपी मिल कंपाऊंड भ्रष्टाचारप्रकरणी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या चौकशीसाठी लोकायुक्‍त नेमण्यास होकार दिल्याने मेहता यांच्यापुढील अडचणी आता वाढल्या आहेत.

मेहता यांची लोकायुक्‍तांकडून चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र लोकायुक्‍त आणि लोकउपायुक्‍त कायदा-१९७१ व विधानसभा उपकलम (३), कलम १७ नुसार लोकायुक्‍त नेमण्यास राज्यपालांनी होकार दिला आहे.


नेमकं काय आहे प्रकरण ?

ताडदेव येथील एम. पी. मिल कंपाऊडमधील एस. डी. कॉर्पोरेशन राबवत असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत विकासकाला अनुकूल भूमिका घेतल्यामुळे प्रकाश मेहता अडचणीत आले होते.

पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी मेहता यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सरकारला धारेवर धरत कामकाज रोखून धरले होते. मेहता यांचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली होती.

अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात मेहता यांची लोकायुक्‍तांकडून चौकशी केली जाईल, असे आश्‍वासन दिले होते.हे देखील वाचा -

तावडे, मेहता आणि देसाईंच्या राजीनाम्यासाठी मुंबई काँग्रेसचे शिष्ठमंडळ राज्यपालांना भेटले

मेहता - देसाई राजीनामे द्या! विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
ताज्या बातम्या