Advertisement

वित्तीय केंद्र मुंबईतच होणार! मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचा बृहत आराखडा अंतिम टप्प्यात आहे. यापूर्वी या वित्तीय सेवा केंद्राची मागणी गुजरातने केली होती. हे खरं असलं तरी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन त्यांना या आराखड्याची सविस्तर माहिती दिल्यावर त्यांनीही हे केंद्र मुंबईतच होणार असल्याचं आश्वासन दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

वित्तीय केंद्र मुंबईतच होणार! मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
SHARES

मुंबई हे देशाचं वित्तीय केंद्र असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतच होणार, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिलं.


अाराखडा अंतिम टप्प्यात

काँग्रेसचे आ. संजय दत्त यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला मुख्यमंत्री उत्तर देत होते. या वित्तीय सेवा केंद्राचा बृहत आराखडा अंतिम टप्प्यात आहे. यापूर्वी या वित्तीय सेवा केंद्राची मागणी गुजरातने केली होती. हे खरं असलं तरी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन त्यांना या आराखड्याची सविस्तर माहिती दिल्यावर त्यांनीही हे केंद्र मुंबईतच होणार असल्याचं आश्वासन दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.



देशात एकच वित्तीय केंद्र

केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केंद्रांच्या अर्थसंकल्पात एका वित्तीय केंद्राला मान्यता दिलेली असताना राज्यात दुसरं वित्तीय केंद्र होऊ शकत नसल्याचं म्हटलं होतं, त्याची आठवण संजय दत्त आणि भाई जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली.

मात्र, आपण त्या नंतर स्वतः अरुण जेटली यांची भेट घेतली असून त्यांच्याशी वित्तीय केंद्रासंदर्भात चर्चा केल्याचं मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केलं.

वित्तीय केंद्रांसाठी ५० हेक्टर जागेची अट असून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जागा कमी पडत असल्याचं मुख्यमंत्र्यानी सांगितलं. मात्र त्यासाठी २ पर्याय उपलब्ध असून मुंबईशिवाय वित्तीय केंद्र दुसरीकडे कुठेही होऊ शकत नसल्याचं माझं वैयक्तिक मत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.




हेही वाचा-

आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईच्या हातून निसटलं- अशोक चव्हाण

अंगणवाडी सेविकांवरील 'मेस्मा'ला अखेर स्थगिती, मुख्यमंत्र्यांची घोषणा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा