Advertisement

फ्लिपकार्टवर बंदी घाला-विखे पाटील

फ्लिपकार्टवरून घातक शस्त्रांची विक्री होत असल्याने फ्लिपकार्टवर सरकारने तातडीने बंदी घालावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

फ्लिपकार्टवर बंदी घाला-विखे पाटील
SHARES

दंगलीनंतर औरंगाबाद शहर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अशात तेथे फ्लिपकार्टवरून घातक शस्त्रांची विक्री होत असल्याने फ्लिपकार्टवर सरकारने तातडीने बंदी घालावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

फ्लिपकार्टवरून 2८ शस्त्रांची खरेदी 

औरंगाबाद शहरात दंगलीनंतर फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून तलवार, चाकू, कुकरी, जांबिया अशी २८ शस्त्रांची खरेदी करण्यात आल्याचा सुगावा पोलिसांना लागल्याने मोठा अनर्थ टळला. पण अशा प्रकारे उघडपणे शस्त्र खरेदी-विक्रीचे व्यवहार अत्यंत घातक आहे. त्यामुळे ऑनलाईन शस्त्र विक्री करणाऱ्या फ्लिपकर्ट या वेबसाईट्सवर सरकारने तातडीने बंदी घालावी, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 


'चौकशी करून कारवाई करा'

सध्या ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण वाढलं आहे. अशात बेकायदेशीरीपणे शस्त्रांची खरेदी-विक्री होणे अत्यंत घातक आहे. औरंगाबादमध्ये हा शस्त्रसाठा का मागवला? त्याचा दंगलीशी तर संबंध नाही ना? या शस्त्राची खरेदी कोणी केली? याची सखोल चौकशी करून संबंधीत व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.


हेही वाचा - 

'ग्राहकांचे लुटलेले पैसे परत करा' राधाकृष्ण विखे-पाटील

कर्नाटकात बळकावलेलं मुख्यमंत्रीपद सोडावंच लागलं- राधाकृष्ण विखे पाटील

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा