Advertisement

सत्यासमोर सरकारला झुकावं लागलं - विखे पाटील


सत्यासमोर सरकारला झुकावं लागलं - विखे पाटील
SHARES

नवी मुंबईतील सिडको जमीन व्यवहाराला मुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती हे विरोधी पक्षांचं मोठं यश अाहे. अखेर सत्यासमोर सरकारला झुकावंच लागलं, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली अाहे.


२ हजार कोटींचा दरोडा 

नवी मुंबईतील सिडको जमीन विक्रीचे व्यवहार स्थगित करण्याचे आदेश देऊन या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली अाहे. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सरकारच्या या निर्णयामुळे आम्ही केलेल्या आरोपांमध्ये तथ्य होते, हे अधोरेखीत झाले अाहे. या व्यवहारात जनतेच्या तिजोरीवर सुमारे २ हजार कोटींचा दरोडा घातला गेला. या व्यवहारात काही विशिष्ट मंडळींची घरे भरण्याचे कारस्थान होते, हे कागदपत्रांवरून स्पष्टपणे दिसून येत अाहे. सरकारने हा व्यवहार स्थगीत केला नसता तर न्यायालयीन चौकशीत नामुष्की पत्करण्याची वेळ सरकारवर हमखास अली असती.


सत्याचा विजय 

 या घोटाळ्यातील आणखी काही दस्तावेज आम्ही सभागृहात मांडणार होतो.  रोज आमदारांची निदर्शनेही करण्याची रणनिती आम्ही आखली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासूनच विरोधी पक्षांचे आमदार आक्रमकही झाले होते. त्यामुळे सरतेशेवटी या व्यवहाराला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारला घ्यावाच लागला. हा सत्याचा आणि विरोधी पक्षांचा मोठा विजय आहे. असंही विखे पाटील म्हणाले.



हेही वाचा -

अखेर सिडको जमीन विक्री व्यवहाराला स्थगिती!

स्वातंत्र्याच्या लढाईत ख्रिश्चन इंग्रजांच्या बाजूने, खासदार गोपाळ शेट्टींचं वादग्रस्त वक्तव्य




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा