युतीच्या आमदारांना ताज हाॅटेलमध्ये 'लाडांचा प्रसाद'

बुधवारी सायंकाळी ७ वाजता कुलाब्यातील पंचतारांकित ताज महल हाॅटेलमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत युती आणि अपक्ष आमदारांसाठी पंचतारांकित मेजवानीचा बेत आखण्यात आला आहे.

SHARE

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी गुरुवारी मतदान होत आहे. या जागेसाठी भाजपाकडून प्रसाद लाड रिंगणात उतरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी ७ वाजता कुलाब्यातील पंचतारांकित ताज महल हाॅटेलमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत युती आणि अपक्ष आमदारांसाठी पंचतारांकित मेजवानीचा बेत आखण्यात आला आहे.


आमदारांना नेत्यांचं मार्गदर्शन

या बैठकीत दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. भाजपच्या आमदारांना भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांनी त्यासंदर्भात निरोप धाडले आहेत.


विधान परिषद निवडणुकीच्या आधी आम्ही आमदारासाठी नेहमीच स्नेह भोजन ठेवत असतो. त्याचनुसार यंदाही आम्ही युतीच्या आमदारांसाठी हा स्नेह भोजनाचा कार्यक्रम ताजमध्ये ठेवला आहे.
- राज पुरोहित, भाजपा प्रतोद


आधीच संपत्तीवरून चर्चेत आलेले प्रसाद लाड पंचतारांकीत स्नेह भोजनाच्या बेतामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.हेही वाचा-

विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी लाड विरुद्ध माने

शिवसेनेनं यूपीत करून दाखवलं! ४ उमेदवार विजयी


संबंधित विषय
ताज्या बातम्या