Advertisement

धनंजय मुंडेंच्या बंगल्याचा गैरवापर, राष्ट्रवादीविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानंतर आचारसंहिता भंगाच्या अनेक तक्रारी आतापर्यंत समोर आल्या आहेत.

धनंजय मुंडेंच्या बंगल्याचा गैरवापर, राष्ट्रवादीविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार
SHARES

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहिता भंगाच्या अनेक तक्रारी आतापर्यंत समोर आल्या आहेत. त्यातच धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसविराेधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.


सरकारी बंगल्यात पत्रकार परिषद

राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरमाना प्रसिद्ध करण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या बी ४ या सरकारी बंगल्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.  आचारसंहिता लागू असताना सरकारी मालमत्तेचा वापर करता येत नाही. त्यामुळंच आचारसंहिता भंगाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात तक्रार करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं यासंबंधी आदेश दिले असून ए वॉर्ड अधिकाऱ्यानं तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.


आरोप-प्रत्यारोप

सध्या मुंडे भावा-बहिणीमध्ये वाक् युद्ध रंगलं आहे. त्यातच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यातच राष्ट्रवादीविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाल्यामुळं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत सापडल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.




हेही वाचा -

शिवसेनेकडून जैनांचा अपमान; मिलिंद देवरा यांचा आरोप

'उर्मिला यांना राजकारणातलं शून्य ज्ञान'– गोपाळ शेट्टी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा