Advertisement

दिलीप वळसे पाटील बनले विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शुक्रवारी निवड करण्यात आली.

दिलीप वळसे पाटील बनले विधानसभेचे हंगामी अध्यक्ष
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शुक्रवारी निवड करण्यात आली. पाटील यांनी याआधीही हे पद भूषवलं असून त्यांना विधीमंडळ कामकाजाचा उत्तम अनुभव आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघडीला शनिवारी बहुमत चाचणीला सामोरं जायचं आहे. त्याआधी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या जागी पाटील यांची निवड करण्यात आली. पाटील यांनी २००९ ते २०१४ या काळात विधानसभा अध्यक्षपद भूषवलं आहे. 

हेही वाचा- शपथविधीच्या आयोजनावर राज्यपाल कोश्यारी नाराज?

सद्यस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्रीपद आणि विधानसभा अध्यक्षपदावरून खेचाखेची सुरू आहे. महाविकास आघाडीच्या आतापर्यंत ठरलेल्या फाॅर्म्युल्यानुसार ५ वर्षे उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे, तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे राहणार होतं. परंतु काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद हवं असल्याने त्यावर दोन्ही पक्षांत सध्या चर्चा सुरू आहे. 

राष्ट्रवादीला विधानसभा अध्यक्षपद मिळाल्यास दिलीप वळसे पाटील यांचीच या पदासाठी नेमणूक होऊ शकते.



हेही वाचा-  

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक न्यायालयाकडून समन्स

कुणी घर देता का घर, फडणवीस नव्या घराच्या शोधात…



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा