अति घाई… नेई! राष्ट्रवादीने लावले रोहित पवारांच्या विजयाचे फलक

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागायला ४८ तास शिल्लक असतानाच कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीने रोहित पवार यांच्या विजयाचे फलक लावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

SHARE

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागायला ४८ तास शिल्लक असतानाच कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीने रोहित पवार यांच्या विजयाचे फलक लावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राष्ट्रवादीला विजयाची इतकी घाई कशी? असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

चुरशीची लढत

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्यात सरळ लढत आहे. राम शिंदे गेल्या निवडणुकीत ८४ हजार ०५८ मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. 

काय आहे फलकावर?

परंतु निकाल जाहीर होण्याआधीच कर्जतमध्ये रोहित पवार यांच्या विजयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. रोहितदादा पवार याचं प्रचंड मतांनी विजय झाल्याबद्दल अभिनंदन, असा मजकूर या फलकांवर लिहिलेला आहे. या फलकावर रोहित पवार यांचा मोठा फोटो असून सोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासहित राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे फोटोही आहेत. 

कोण जिंकणार?

ऐन मोक्याच्या ठिकाणी हे फलक लावण्यात आल्याने हे फलक रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय अनेक तरुणांनी या फलकाचा व्हिडिओ शूट करून हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल केला आहे. त्यामुळे उद्या रोहित पवार खरंच जिंकणार की राम शिंदे हे पोस्टर उतरवणार? अशी चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे.हेही वाचा-

Exit Polls: शिवसेनेशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणं अशक्य- संजय राऊत

Exit Polls: राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहणार- जयंत पाटीलसंबंधित विषय
ताज्या बातम्या