Advertisement

राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान - राज ठाकरे

राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान - राज ठाकरे
SHARES

ज्या गोष्टीची महाराष्ट्राला भीती वाटत होती, तीच गोष्ट दुर्दैवाने घडली. एकाही पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करण्यात यश न आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

हेही वाचा- अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू

राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं होतं. तरीही मुख्यमंत्रीपद आणि सत्ता वाटपावर अडून बसलेल्या या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा दावा करण्यात अपयश आल्याने राज्यपालांच्या शिफारसीनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. 

हेही वाचा- शिवसेनेच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार

या सगळ्या प्रकारावर पहिल्यांदाच मतप्रदर्शन करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याचा प्रकार म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान असल्याची टीका केली.  हेही वाचा-
राज्यात याआधी 'ह्या' वेळी होती राष्ट्रपती राजवट

कशी लागू होते राष्ट्रपती राजवट?संबंधित विषय