काँग्रेसचे आमदार नाराज, शरद पवारांचेही हात वर

काँग्रेसची भूमिका ठरत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही नाखूष असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालीच, तर त्याविरोधात राज्यभर दौरे काढण्याचे संकेत पवारांनी दिले आहेत.

SHARE

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा न दिल्यामुळे काँग्रेसमधील बहुतांश आमदार अत्यंत नाराज असल्याची चर्चा आहे. राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्याचं निमंत्रण दिलं आहे. तरीही काँग्रेसची भूमिका ठरत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही नाखूष असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालीच, तर त्याविरोधात राज्यभर दौरे काढण्याचे संकेत पवारांनी दिले आहेत. 

हेही वाचा- शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा, मात्र वेळ निघून गेली...

राज्यात कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू होऊ नये म्हणून काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार आग्रही होते. वैचारीक मतभेद असले, तरी ते बाजूला सारून काँग्रेसने सत्तेत सहभागी न होता शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा द्यावा, अशी भूमिका काँग्रेसच्या बहुतांश आमदारांनी बैठकीत मांडली. काँग्रेस आमदारांचं म्हणणं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांच्यापुढं मांडूनही काँग्रेसने शेवटपर्यंत शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र दिलं नाही. 

हेही वाचा- राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं निमंत्रण, पण संख्याबळाचं काय?

सोमवारी दिवसभरात काँग्रेसच्या अनेक आमदारांनी शरद पवार आणि अजित पवार यांना फोन करून 'सोनियाजींना समजवा', अशी विनंती केली. परंतु, 'सोनिया यांना जे सांगायचे ते आपण सांगितलं, यापुढचा निर्णय त्यांचा असेल', असं पवार यांनी या आमदारांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे जयपूरला असलेले आमदार मुंबईत परतल्यानंतर काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे. यापुढे आम्ही आमचा काय तो निर्णय घेऊ', असे खडे बोलही या आमदारांनी काँग्रेस नेत्यांना सुनावल्याचं समजत आहे.हेही वाचा-

पवारांची लिलावतीत संजय राऊतांशी गुप्तगू

दिरंगाई नडणार? काँग्रेस-राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावरसंबंधित विषय
ताज्या बातम्या