Advertisement

राज्यपालांनी पुरेसा वेळच दिला नाही, शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका

सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडून पुरेसा वेळ देण्यात आला नाही, असं म्हणत शिवसेनेने राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

राज्यपालांनी पुरेसा वेळच दिला नाही, शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका
SHARES

सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडून पुरेसा वेळ देण्यात आला नाही, असं म्हणत शिवसेनेने राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवाय या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्याची विनंतीही शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा- Live Updates- राज्यपालांकडून केंद्रीय गृहमंत्र्यांना राष्ट्रपती राजवटीचं पत्रक

पुरेसं संख्याबळ नसल्याचं कारण देत भाजपने सत्ता स्थापनेला नकार दिला होता. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करण्याचं निमंत्रण दिलं. परंतु राज्यपालांनी शिवसेनेला फक्त २४ तासांचीच मुदत दिली. याउलट भाजपला सत्ता स्थापनेसाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. राज्यपालांनी भाजपच्या आदेशानुसार पक्षपातीपणा करत आम्हाला सत्तास्थापनेसाठी संधी दिली नाही, असा आरोप शिवसेनेने या याचिकेत केला आहे.

हेही वाचा- शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा, मात्र वेळ निघून गेली...

आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेऊन शिवसेनेच्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर करत सत्तास्थापनेचा दावा केला. तसंच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र देण्यासाठी ३ दिवसांचा कालावधी वाढवून द्यावा, अशी विनंती केली. मात्र, राज्यपालांनी शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास नकार दिला. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचं अनिल परब म्हणाले.

शिवसेनेच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. यासंदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कपिल सिब्बल यांच्याशी चर्चा केली आहे. या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती देखील शिवसेनेनं केली आहे. 


    


हेही वाचा-


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा