महाशिवआघाडीचा शिलेदार लिलावतीतूनही सक्रीय!

महाराष्ट्रातील राजकारणात क्षणाक्षणाला उत्कंठावर्धक घडामोडी घडत असताना लिलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले शिवसेनेचे आक्रमक नेते खासदार संजय राऊत तिथूनही सक्रीय असल्याचं दिसून येत आहे.

  • महाशिवआघाडीचा शिलेदार लिलावतीतूनही सक्रीय!
SHARE

महाराष्ट्रातील राजकारणात क्षणाक्षणाला उत्कंठावर्धक घडामोडी घडत असताना लिलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले शिवसेनेचे आक्रमक नेते खासदार संजय राऊत तिथूनही सक्रीय असल्याचं दिसून येत आहे. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर राऊत सोमवारी दुपारी लिलावतीत दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील समान वाट्यावरून शिवसेनेने भाजपला चांगलंच कोंडीत पकडलं. शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडणाऱ्या राऊत यांनी आपल्या वाकचातुर्याने एकट्यानेच भाजप नेत्यांना नामोहरम केलं. एवढंच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी प्रत्येक टप्प्यावर वाटाघाटी करून महाशिवआघाडीच्या शक्यतेला बळकटी प्राप्त करून दिली. 

हेही वाचा- Live Updates- महाराष्ट्रात सत्ता कुणाची?

काँग्रेसकडून शिवसेनेला पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असतानाच छातीत दुखू लागल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. दोन ब्लॉकेजेस आढळल्याने त्यांच्यावर ताबडतोब अँजिओप्लास्टी करण्यात आली. परंतु अँजिओप्लास्टी होऊनही ते शांत बसलेले नाही. संजय राऊत यांनी सकाळीच ट्विट करत आपण अजूनही राज्यातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचं दाखवून दिलं. 


त्यांचा एक फोटोही दुपारी व्हायरल झाला. या फोटोत ते लिहिताना दिसत आहेत. हा फोटाे अँजिओप्लास्टी होण्याआधीचा असून त्यात ते सामनासाठी अग्रलेख लिहित होते, असं म्हटलं जात आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राऊत यांची भेट घेत त्यांच्यासोबत १५ मिनिटे चर्चा केली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केल्याचं सांगितलं. उद्धव यांच्यापाठोपाठ भाजप नेते आशिष शेलार देखील लिलावतीत गेले. मात्र बाहेर आल्यावर त्यांनी राऊत यांच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. हेही वाचा-

दिरंगाई नडणार? काँग्रेस-राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर

पवारांची लिलावतीत संजय राऊतांशी गुप्तगूसंबंधित विषय
ताज्या बातम्या