Advertisement

मुंबईतील सुविधा म्हणजे जागा दिसली आणि उभारले तंबू अशा नाहीत- मुख्यमंत्री

मुंबईतील सुविधा म्हणजे जागा दिसली आणि उभारले तंबू अशा नाहीत, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला फैलावर घेतलं.

मुंबईतील सुविधा म्हणजे जागा दिसली आणि उभारले तंबू अशा नाहीत- मुख्यमंत्री
SHARES

मुंबईमध्ये ज्या रीतीने या सुसज्ज सुविधा निर्माण झाल्या आहेत, तशा त्या महानगर क्षेत्रातही होणं अपेक्षित होतं आणि वारंवार तशा सूचना देण्यात आल्या होत्या, पण पाहिजे तेवढ्या सुविधा उभारलेल्या दिसत नाहीत. मुंबईतील सुविधा म्हणजे जागा दिसली आणि उभारले तंबू अशा नाहीत, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला (maharashtra cm uddhav thackeray speaks over coronavirus crisis in thane district ) फैलावर घेतलं. ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिका आयुक्तांची व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने नुकताच ५० हजारांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे मुंबईपाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यातील कोरोना संकटाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

सुविधा उभारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, मार्चपासून जुलैपर्यंतच्या कालावधीत आपण जम्बो सुविधा उभारण्यावर भर दिला. त्यानुसार मुंबईत जशा सुविधा निर्माण झाल्या, तशा संपूर्ण महानगर क्षेत्रातही होणं अपेक्षित होतं, वारंवार तशा सूचना देण्यात आल्या होत्या, पण पाहिजे तेवढ्या सुविधा उभारलेल्या दिसत नाहीत. मुंबईतील सुविधा म्हणजे जागा दिसली आणि उभारले तंबू अशा नाहीत. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित ड्रेनेज, शौचालय, पिण्याचे पाणी या सोयी आहेत. आयसीयू, डायलेसिस सुविधा आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने या सुविधा प्रत्येक पालिका क्षेत्रात उभारणं सुरु करा. यात मोठे उद्योग, कंपन्या, संस्था यांची देखील मदत घ्या. पालिकांनी आवश्यक त्या औषधांचा पुरेसा साठा ठेवला पाहिजे, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले.

हेही वाचा - Covid-19 In Thane: ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ५० हजार पार

कोरोना दक्षता समित्या

 ठाणे जिल्ह्यात कोरोनाची वाढती साथ चिंताजनक आहे. मात्र कोरोनाची एकांगी लढाई लढू नका. कोरोनाची लढाई फक्त सरकारची नाही. वाड्या-वस्त्या, कॉलनीमध्ये नागरिकांच्या कोरोना दक्षता समित्या बनवा. स्वयंसेवी संस्था, युवकांना यात सहभागी करून घ्या. ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध नागरिक यांना दुसरे काही आजार आहेत का तसंच त्यांची ऑक्सिजन पातळीबरोबर आहे का, परिसरात कुणाला काही आजार आहेत का, स्वच्छता  नियमित केली जाते का, लोक मास्क घालतात का? या तसंच इतर अनेक बाबतीत या नागरिकांच्या समित्याची आपणास मदत होईल.  

मुंबईत २०१० मध्ये  मलेरिया, डेंग्यूच्यावेळी मुंबईच्या वस्त्यावस्त्यांत लोकांच्या मदतीने फवारणी केली होती. त्याप्रमाणे मिशन मोडवर हे काम सर्वांनी करावं. लोकांमध्ये जिद्द निर्माण करा म्हणजे ही लढाई लढणं सोपं जाईल, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा