Advertisement

fuel price hike: इंधन दरवाढीतून मोदी सरकारची लूटमार- बाळासाहेब थोरात

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ करून मोदी सरकार सर्वसामान्यांची लूटमार करत आहे. याचा निषेध करत, सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी काँग्रेसतर्फे हे आंदोलन पुकारण्यात आल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.

fuel price hike: इंधन दरवाढीतून मोदी सरकारची लूटमार- बाळासाहेब थोरात
SHARES

एका बाजूला कोरोना संकट, लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलेलं असताना केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या इंधन दरवाढीमुळे कंबरडं मोडायची वेळ आले. केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घेतली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्यााचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी (maharashtra congress president balasaheb thorat protests against fuel price hike) भाजपवर निशाणा साधला. 

देशभरात पेट्रोल व डिझेलची दरवाढ सातत्याने सुरू आहे. ६ जून पासून दररोज ६० ते ७० पैसे प्रती लिटरमागे पेट्रोल व डिझेलचे दर वाढविले जात आहे. मागील १९ दिवसांच्या कालाावधीत पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये प्रती लिटर ७ ते ८ रुपये एवढी वाढ झाली आहे.  या विरोधात काँग्रेसने सोमवारी देशभर आक्रमक पवित्रा घेत आंदोलनास सुरूवात केली आहे. पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा - आम्ही आघाडीसोबतच, सामनाने नीट माहिती घेऊन लिहावं- बाळासाहेब थोरात 

यासंदर्भात बाळासाहेब थोरात म्हणाले, केंद्र सरकारचं कुठलंही भक्कम सहकार्य मिळत नसताना देखील प्रत्येक राज्य आपापल्या परीने कोरोना संकटाचा मुकाबला करत आहे. मागील ३ महिन्यांपासून सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे प्रत्येक राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे, तर सर्वसामान्य घरीच अडकून बसल्याल्यामुळे त्यांच्याही उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. 

अशा स्थितीत महाराष्ट्रात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अर्थव्यवस्थेचा गाडा हळुहळू सुरू करण्यात येत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ करून मोदी सरकार सर्वसामान्यांची लूटमार करत आहे. याचा निषेध करत, सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी काँग्रेसतर्फे हे आंदोलन पुकारण्यात आल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले. 

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असताना राज्य सरकार हा प्रादुर्भाव थोवण्यासाठी हरऱ्हेने प्रयत्न करत आहे. परंतु एवढ्या मोठ्या संकटात देखील विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचं राजकारण करत आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांमध्ये समन्वय असून सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून हे सरकार निर्णय घेत आहे. विरोधकांनी कितीही टीका केली तरी महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्षे टिकणार आहे, असा विश्वास देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा - भाजपचं वागणं म्हणजे महाराष्ट्रद्रोहच, बाळासाहेब थोरातांची जळजळीत टीका

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा