Advertisement

काँग्रेसचा पुन्हा महागाईविरोधात एल्गार, करणार राज्यभर आंदोलन

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस नेते व पदाधिकारी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, एलपीजी गॅसच्या महागाईविरोधात महिला काँग्रेस गॅस कार्यालय आणि पेट्रोल पंपासमोर संकल्प करणार आहेत.

काँग्रेसचा पुन्हा महागाईविरोधात एल्गार, करणार राज्यभर आंदोलन
SHARES

पेट्रोल-डिझेल, गॅसची दरवाढ, वाढती महागाई याविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पुन्हा एकदा दंड थोपटले असून याविराेधांत सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आंदोलन करण्याचा संकल्प काँग्रेसने हाती घेतला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त हा संकल्प हाती घेण्यात येणार आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गांधी भवन इथं आयोजित कार्यक्रमात सांगितलं की, कोरोनाने देशात विदारक चित्र असताना राहुल गांधी यांचा वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरा करणे काँग्रेस विचाराला पटणारं नाही. हे लक्षात घेऊन राहुल गांधी यांचा वाढदिवस हा ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे.

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस नेते व पदाधिकारी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. तर पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, एलपीजी गॅसच्या महागाईविरोधात महिला काँग्रेस गॅस कार्यालय आणि पेट्रोल पंपासमोर संकल्प करणार आहेत.

हेही वाचा- हीच का उपकाराची परतफेड?, नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

युवक काँग्रेस/एनएसयुआयचे कार्यकर्ते यावेळी बेरोजगारीविरोधात आंदोलन करून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतील. देशाला वाचवायचं असेल, तर राहुल गांधी यांच्याशिवाय पर्याय नसून २०२४ साली राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प या दिवशी केला जाणार आहे, असेही पटोले यांनी सांगितलं.

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश काँग्रेसचे दादर येथील नूतनीकरण केलेल्या टिळक भवन या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व मंत्री उपस्थित राहणार आहेत. यानंतर माजी अर्थराज्यमंत्री डॉ. सुनिल देशमुख हे आपल्या सहका-यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यासोबतच राज्यातील विविध पक्षाचे प्रमुख नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

(maharashtra congress will organised protest rally against modi government on rahul gandhi birthday)

हेही वाचा- पेट्रोल-डिझेल शंभर पार, काँग्रेसचं मोदी सरकारविरोधात पेट्रोल पंपांवर आंदोलन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा