Advertisement

कर्जमाफीच्या लाभार्थी 'नोकरदार' शेतकऱ्यांवर कारवाई?


कर्जमाफीच्या लाभार्थी 'नोकरदार' शेतकऱ्यांवर कारवाई?
SHARES

कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये 'नोकरदार' शेतकरी आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत राज्य सरकारने दिले आहेत. कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये शहरातील लाभार्थ्यांचे नाव पुढे आल्याने सरकारवर बरीच टीका झाली होती.

त्यामुळे कर्जमाफीच्या अर्जाची छाननी झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावाच्या सूचीचे चावडी वाचन करण्याचा निर्णय झाल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली आहे.

बँकांकडून आलेली माहिती आणि ऑनलाईन अर्जांची पडताळणी करून अंतिम यादीचे वाचन ग्रामपंचायत स्तरावर होईल. या यादीत नोकरदार शेतकरी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. २२ सप्टेंबर रोजी शेवटच्या दिवशी ऑनलाईन अर्जाचा दुपारपर्यंत आकडा ५७,६८,२५४ वर पोहोचल्याची माहिती आहे.


चावडी वाचनाला काही मंत्र्यांचा विरोध

अर्जाची छाननी झाल्यानंतर ग्रामपंचायत स्तरावर चावडी वाचन करावे की नाही? यावरून मंत्रीगटाच्या उपसमितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. चावडी वाचन करण्याला काही मंत्र्यांनी या बैठकीमध्ये विरोध दर्शविल्याचीही माहिती समोर आली.

चावडी वाचन केल्याने बोगस शेतकरी समजण्यास मदत होईल, असे काही मंत्र्यांचे म्हणणे आहे. स्वतः सहकार मंत्री सुभाष देशमुख देखील चावडी वाचन करण्याविषयी सकारात्मक आहेत. परंतु काही मंत्री मात्र या जाहीर चावडी वाचनाला विरोध करत आहेत.



हेही वाचा -

कर्जमाफी झालेले मुंबईतले 813 शेतकरी कोण?

शेती करणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना कर्जमाफी द्या - भाई जगताप

३१ ऑक्टोबरपूर्वी कर्जमाफी देणार - मुख्यमंत्री



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा