Advertisement

अजित पवार अजूनही नाराज? अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर ठाम

मी आज मंत्रीपदाची शपथ घेणार नसलो, तरी कुठल्याही प्रकारे नाराज नाही, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

अजित पवार अजूनही नाराज? अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर ठाम
SHARES

मी आज मंत्रीपदाची शपथ घेणार नसलो, तरी कुठल्याही प्रकारे नाराज नाही, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल? हे पक्षाच्या बैठकीतच ठरवण्यात येईल, असं म्हणत चर्चांना पूर्णविराम दिला.

मी आज माझी बहिण सुप्रियासोबत शपथविधीसाठी जाणार आहे. माझ्या मनात कोणतीही नाराजी नाही. मी तुम्हाला नाराज दिसतोय का? असा प्रश्नही त्यांनी माध्यमांना विचारला.

हेही वाचा-  शेतकऱ्यांना दिलेला शब्द उद्धव ठाकरेंनी पाळला

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या पदावर ५ वर्षे कायम राहतील, असं महाविकास आघाडीतर्फे ठरवण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष असं सूत्रंही ठरवण्यात आलं आहे. परंतु अजित पवार अजूनही अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर अडून असल्याचं म्हटलं जात आहे. 

अजित पवार यांनी सकाळी सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असं सांगण्यात येत असलं, तरी राष्ट्रवादीकडून केवळ जयंत पाटील आणि छगन भुजबळ या नेत्यांनाच शपथविधीत सहभागी होण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार की नाही? यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे, त्यातच पहिल्या टप्प्यातील शपथविधी सोहळ्यात त्यांचं नाव नसल्याने ते अजूनही नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.   



हेही वाचा-

शपथविधीसाठी उद्धव ठाकरेंचे मोदींना निमंत्रण

सुप्रिया सुळेंचे भावनिक ट्विट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा