Advertisement

महाराष्ट्र सरकारचा 'या' मोठ्या कंपन्यांसोबत ३५ हजार कोटींचा करार

नवीन गुंतवणूकीमुळे महाराष्ट्रात किमान २४ हजार जॉब निर्माण होतील.

महाराष्ट्र सरकारचा 'या' मोठ्या कंपन्यांसोबत ३५ हजार कोटींचा करार
SHARES

सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे की, महाराष्ट्र सरकार राज्यात नवीन व्यवसायासाठी ३५ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहे.

सोमवारी गुंतवणूकदारांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. या नवीन गुंतवणूकीमुळे राज्यात किमान २४ हजार जॉब निर्माण होतील.

गुंतवणूकदारांमध्ये नवी मुंबईतील डेटा सेंटरमधील नेटमॅजिक ( १० हजार कोटी), अदानी ग्रुप ( ५ हजार कोटी), ईएसआर इंडिया (४ हजार ५०० कोटी) आणि कोल्ट, यूके (४ हजार ५०० कोटी) या कंपन्यांचा समावेश आहे.

कोरोनाव्हायरसचा उद्रेक आणि त्यानंतरच्या आर्थिक मंदीनंतरची ही मोठी बातमी आहे. कारण यामुळे डेटा सेंटर, लॉजिस्टिक्स, तेल आणि गॅस, वाहन, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांत नवीन रोजगार निर्माण होतील.

दरम्यान, कोरोनव्हायरसच्या वाढत्या रुग्णांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं गेल्या आठवड्यात ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. राज्याच्या 'मिशन बिगॅन अगेन' योजनेअंतर्गत हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. परिपत्रक काढत महाविकास आघाडी सरकारनं सर्व विभागांना या मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं आहे.



हेही वाचा

मोदी सरकारने तोंड उघडण्यास मनाई केलीय का? सुशांतप्रकरणी काँग्रेसचा सीबीआयला सवाल

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा