Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
SHARES

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेट्सच्या माध्यमातून दिली आहे. घरी परतल्यानंतर अजित पवार साधारणत: आठवडाभर घरीच विश्रांती घेणार आहेत.

थकवा व अंगात कणकण असल्यानं मागील २ दिवसांपूर्वी होम क्वारंटाइन झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपचारांसाठी ७ दिवसांपूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाच्या काळात अजित पवार यांचा कामाचा धडाका सुरू होता. लॉकडाऊनच्या काळातही मंत्रालयात त्यांची उपस्थिती असायची. ते बैठका घेत होते. मात्र, करोनाच्या अनुषंगाने ते सर्व प्रकारची काळजी घेत होते. 

हेही वाचा - राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यात रंगला 'टेनिस'चा सामना

काही दिवसांपूर्वीच त्यांनी अतिवृष्टग्रस्त भागांचा दौरा केला होता. तो दौरा करून परतल्यानंतर त्यांना थकवा जाणवत होता. खबरदारी म्हणून त्यांनी कोरोनाची चाचणीही केली होती. ती निगेटिव्ह आली होती. त्यानंतरही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार अजित पवार घरीच होते. त्यांनी शासकीय बैठका व पक्षपातळीवरील कार्यक्रमही रद्द केले होते. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश सोहळ्यालाही त्यांना उपस्थित राहता आलं नव्हतं. 'देवगिरी' निवासस्थानातूनच ते दैनंदिन शासकीय कामकाज करत होते. (ncp leader ajit pawar discharged from breach candy hospital after covid 19 test negative)

मात्र ४-५ दिवस होम क्वारंटाइन राहिल्यानंतर कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी खबरादारीचा उपाय म्हणून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होण्याचं ठरवलं. आता उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले असून रुग्णालयातून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्सद्वारे ही माहिती दिली आहे. शिवाय त्यांनी रुग्णालयातील डाॅक्टर्स आणि नर्सचे आभारही मानले आहेत.

हेही वाचा - होम क्वारंटाईनमध्येही अजित पवारांचं काम जोमात


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा