Advertisement

महाराष्ट्र क्रांती सेना निवडणुकीच्या रिंगणात, लोकसभा, विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

मराठा क्रांती मोर्चाने पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र क्रांती सेना नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. आता या पक्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र क्रांती सेना निवडणुकीच्या रिंगणात, लोकसभा, विधानसभेच्या सर्व जागा लढवणार
SHARES

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठं आंदोलन उभं करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र क्रांती सेना नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. आता या पक्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र क्रांती सेना लोकसभेच्या ४८, तर विधानसभेच्या २८८ जागा लढणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सोमवारी कोल्हापुरात दिली.


पक्ष राजकीय आखाड्यात

मराठा क्रांती मोर्चाचा आणि इतर मराठा समाजाचा राजकीय पक्ष काढण्यास विरोध असताना विनोद पाटील यांनी महाराष्ट्र क्रांती सेना नावाने पक्षाची स्थापना केली आहे. हा पक्ष राजकीय आखाड्यात उतरून निवडणुकाही लढवणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय या पक्षाने घेतला असून आता त्यादृष्टीनं तयारीला लागण्याचे आदेश सुरेश पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.


पहिला मेळावा २५ नोव्हेंबरला

विधानसभा-लोकसभा निवडणुका लढवण्याचं जाहीर करतानाच सुरेश पाटील यांनी पक्षाचा पहिला मेळावा २५ नोव्हेंबरला होणार असल्याचंही जाहीर केलं आहे. या मेळाव्यापासूनच खऱ्या अर्थानं पक्षाच्या राजकीय वाटचालीला सुरुवात होणार असल्यानं हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे.



हेही वाचा - 

मराठा समाजाचा आता महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष

मराठा आरक्षणाचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करा - याचिकेद्वारे मागणी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा