Advertisement

अयोध्येला निघाले जोशात, राजीनामे मात्र खिशात; मनसेची बॅनरबाजी


अयोध्येला निघाले जोशात, राजीनामे मात्र खिशात; मनसेची बॅनरबाजी
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे नाही. शनिवारी मनसेनेने शिवसेना भवन इथं एक पोस्टर लावत अयोध्या दौऱ्याची चांगलीच खिल्ली उडवली. अयोध्येला निघाले जोशात, राजीनामे मात्र खिशात अशा मथळ्याचा बॅनर मनसेकडून लावण्यात आला होता. पण नंतर तो पोलिसांनी काढून टाकला. 


सरकारमध्ये कसे राहता?

शनिवारी उध्दव ठाकरे कुटुंबासहीत अयोध्येला रवाना झाले आहेत. या अयोध्या दौऱ्याचं घोषवाक्य हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फिर सरकार. आधी मंदिर मग सरकार असं म्हणता, ज्या सरकारच्या बरोबर सत्तेत आहात त्या सरकारने राम मंदिरसाठी काही केलं नाही असं म्हणता, मग त्याच सरकारमध्ये कसे राहता असा आमचा सवाल आहे. त्यामुळेच अयोध्येला निघाले जोशात, राजीनामे मात्र खिशात असं बॅनर मनसेकडून लावण्यात आलं होतं, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली.


पोलिसांशी वाद

शिवसेना भवनजवळ मनसेकडून हा बॅनल लावण्यात अाला होता. या बॅनरवरून पोलीस आणि मनसेमध्ये मोठा वाद झाला. शेवटी पोलिसांनी हे बॅनर काढून टाकलं. असं असलं तरी या बॅनरची मात्र चांगलीच चर्चा रंगली.



हेही वाचा - 

राम मंदिरासाठी विधेयक आणा- संजय राऊत

पहिले आमचे छत्रपती म्हणत नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर कुरघोडी




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा