Advertisement

परिवहनमंत्री अनिल परब कोरोनाग्रस्त

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने त्यांना तातडीने वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

परिवहनमंत्री अनिल परब कोरोनाग्रस्त
SHARES

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने त्यांना तातडीने वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (maharashtra transport minister anil parab anil parab tested covid 19 positive

कोरोना संदर्भातील सर्व काळजी घेऊन परिवहन मंत्री आपल्या विभागाचा कारभार बघत होतो. परंतु त्यांना अचानक कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यात त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनिल परब यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे. 

हेही वाचा - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी सर्व शिवसेना आमदारांची बैठक बोलवली होती. मात्र शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आणि पारिवहन मंत्री असलेल्या अनिल परब यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त समजताच ही बैठक रद्द करण्यात आली. त्याआधी मुंबईतील शिवसेनेच्या विभागप्रमुखांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. कोविड चा प्रादुर्भाव, त्यावरील उपाययोजना या विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत अनिल परब उपस्थित होते.

आतापर्यंत राज्य सरकारमधील डझनभराहून अधिक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, सुनील केदार, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे या मंत्र्यांचा समावेश आहे. या सर्वांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा