Advertisement

विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’च्या ७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

राज्यभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं ७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’च्या ७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
SHARES

राज्यभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं ७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. रविवारी ही यादी जाहीर केली असून, यामध्ये पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातून मुकुंद किर्दत, वडगाव शेरी मतदारसंघातून गणेश ढमाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच, मराठवाड्यातील जालना येथील पत्रकार कैलास फुलारी यांना जालना मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

'यांना' उमेदवारी जाहीर

ठाणे जिल्ह्यात मुंब्रा कळवा मतदारसंघातून डॉ. अल्तामाश फैजी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मीरा रोड विधानसभा मतदारसंघातून नरेंद्र भांबवानी, मध्य सोलापूरची उमेदवारी खतीब वकिल आणि नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर मतदारसंघातून डॉ. सुनील गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


८ उमेदवारांची यादी

याआधी आपनं ८ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. मात्र आता दुसरी ७ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, सध्यस्थितीत आपचे १५ उमेदवार विधानसभेच्या रिंगणात आहेत. मुकुंद किर्दत हे पुण्यातील आपचे अध्यक्ष असून, स्त्री पुरुष समानतेसाठी ते पुरुष उवाच या व्यासपीठाच्या माध्यमातून काम करतात, माहिती अधिकार चळवळीतील ते सक्रिय कार्यकर्ते आहेत.

गणेश ढमाले हे ऑटोरिक्षा चालक असून, पुण्यातील आम आदमी रिक्षाचालक संघटनेचे ते उपाध्यक्ष आहेतमुंबई उच्च न्यायालय आणि सोलापूर जिल्हा न्यायालयात वकिली करणारे खतीब वकिल हे दक्षिण सोलापूरचे उमेदवार आहेत. महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनचे संस्थापक सचिव नरेंद्र भांबवानी हे मीरा रोडचे उमेदवार आहेत.



हेही वाचा -

बेस्टच्या इलेक्ट्रीक बसच्या चार्जिंगसाठी सौर, हरितचा पर्याय

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ८० जणांना उमेदवारी जाहीर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा