Advertisement

आरक्षण मिळेपर्यंत आझाद मैदानावरून माघार नाही; मराठा क्रांती मोर्चाचा निर्धार


आरक्षण मिळेपर्यंत आझाद मैदानावरून माघार नाही; मराठा क्रांती मोर्चाचा निर्धार
SHARES

शांततेच्या मार्गानं, लोकशाही पद्धतीनं काढण्यात येणारा मोर्चा अडवत, आंदोलकांना ताब्यात घेत राज्य सरकार मराठा समाजाचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना केला आहे.  तर आंदोलन दडपण्याचा कितीही प्रयत्न सरकारकडून झाला तरी आता माघार नाही. सरकारच्या कुठल्याही दडपशाहीला आता आम्ही बळी पडणार नाही, घाबरणार नाही असं म्हणत मराठा क्रांती मोर्चानं आता आरक्षण मिळेपर्यंत आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचंही विरेंद्र पाटील यांनी सांगितलं आहे.


मुंबईच्या वेशीवर अडवले

मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यभर संवाद यात्रा काढण्यात आली. या संवाद यात्रेचा समारोप मुंबईत विधानभवनावरील मोर्चाच्या माध्यमातून होणार होता. त्यानुसार सोमवारी मुंबई गाठण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक निघाले  खरे. पण ते मुंबईत पोहचलेच नाहीत. पोलिसांनी मुंबईच्या वेशीवरच मोठ्या संख्येनं आंदोलकाच्या गाड्या अडवल्या नि आंदोलकांना ताब्यात घेतलं. तर कोल्हापुर, पुणे, नाशिक इथंही पोलिसांनी आंदोलकांना अडवत ताब्यात घेतलं आहे. 


आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

पोलिस आणि सरकारच्या या भूमिकेनंतर मराठा क्रांती मोर्चानं यावर नाराजी व्यक्त करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचं म्हटलं आहे. तर कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेण्यात येणार नसून आंदोलन सुरूच राहील असंही क्रांती मोर्चानं स्पष्ट केलं आहे. गाड्या अडवल्या तरी आंदोलक मुंबईत येतीलच. आज नाही आले तरी उद्या परवा येतील आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करतील,  असंही विरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.


अांदोलन दडपणं दुर्दैवी - मुंडे

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांना अडवण्याचा मुद्दा सभागृहातही गाजला. लोकशाहीच्या मार्गानं सुरू असलेलं अांदोलन अशा पद्धतीनं सरकारनं दडपणं हे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी केला आहे. 


विधानभवनाबाहेर काळे झेंडे

मराठा आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असला तरी सोमवारी दुपारी काही मराठा आंदोलक विधानभवनाजवळ पोहोचले. त्यांनी सरकारचा जोरदार निषेध करत सरकारला काळे झेंडे दाखवले. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना मरिन लाईन्स पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याचं समजतं आहे.हेही वाचा - 

सरकार मांडणार मराठा आरक्षणाचं विधेयक, विरोधक मात्र अहवालावर ठाम

मराठा क्रांती मोर्चा गनिमीकाव्याने मुंबईत धडकणार
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा