Advertisement

नाहीतर, २५ नोव्हेंबरपासून पुन्हा एल्गार, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा


नाहीतर, २५ नोव्हेंबरपासून पुन्हा एल्गार, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा
SHARES

मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांवर राज्य सरकारने दिलेली आश्वासने पोकळच ठरल्याचं म्हणत मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षणा संबंधीची कार्यवाही पूर्ण न झाल्यास राज्यभर पुन्हा 'एक मराठा लाख मराठा', अशी हाक घुमेल असा कडक इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे. मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी शुक्रवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेत २५ नोव्हेंबर पासून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याच सांगितलं आहे.


काय होतं आश्वासन?

मराठा आरक्षणावर सरकारने १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करत आरक्षणचा मुद्दा निकाली लावू, गरज पडल्यास त्यासाठी विशेष अधिवेशन घेऊ, असं आश्वासन दिलं होतं. मात्र १५ नोव्हेंबर जवळ आलं तरी सरकारकडून यादृष्टीने कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. ही मराठा समाजाची फसवणूक आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत ही कार्यवाही पूर्ण न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उरण्याचा निर्णय मराठा क्रांती ठोक मोर्चाने घेतला आहे.


आंदोलनाला पुन्हा सुरूवात

त्यानुसार २५ नोव्हेंबर पासून आंदोलनला सुरुवात होणार आहे. मुख्य आंदोलन हे परळीत होणार आहे. तर राज्यभर सर्व खासदार-आमदारांच्या घराबाहेर कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं आहे. या आंदोलनानंतर देखील सरकारने लक्ष न दिल्यास १ डिसेंबरपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.



हेही वाचा-

स्वयंघोषित समन्वयांना धडा शिकवू, मराठा ठोक क्रांती मोर्चाचा इशारा

मराठा आरक्षण: मागासवर्ग अायोग १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करणार अंतिम अहवाल



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा