सेना-भाजप युतीविरोधात प्रचार करणार; मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युतीविरोधात प्रचार करणार असल्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चानं घेतला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकारनेच न्यायालयात प्रलंबित ठेवला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

SHARE

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युतीविरोधात प्रचार करणार असल्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चानं घेतला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकारनेच न्यायालयात प्रलंबित ठेवला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चानं मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमीका स्पष्ट केली.


सभा उधळवणार

सरकारमधील कोणत्याही उमेदवाराला मतदान करणार नाही, असा निर्णय मराठा क्रांती मोर्चानं घेतला आहे. तसंच शिवसेना-भाजपला राज्यात बूथ लावून देणार नसून ज्या ठिकाणी त्यांची सभा असेल ती उधळवून लावू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ज्यांनी मराठा समाजाविरोधात भूमीका घेतली त्यांना आम्ही पाडणार असून युतीविरोधात गावागावात प्रचार केला जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.


शिवसेनेकडून अपमान

आपण सरकारमध्ये असल्याने मराठा बांधवांवरील सर्व गुन्हे माफ होतील, असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. परंतु मातोश्रीवर गेलेल्या शिष्टमंडळाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला. मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा आदोलकांवरीलकांवरील गुन्हे मागं घेण्याचा प्रश्न असेल, त्याबद्दलही अद्याप निर्णय झाला नाही.  जर दोन दिवसात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शिवसेना भाजपवर बहिष्कार घालण्याचाही इशरा यावेळी देण्यात आला.


... अन्यथा आंदोलन

शिवसेना भवनातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोखाली खाली लावा. अन्यथा त्या विरोधातही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तसंच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ हे स्वार्थासाठी तयार करण्यात आलं आहे. त्यातून कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नाही. त्यामुळं ते बर्खास्त करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
हेही वाचा -

शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा : नितीन सरदेसाई

इंजिनीअरिंग परीक्षेदरम्यान फक्त एक दिवस सुट्टी?
संबंधित विषय
ताज्या बातम्या