वैद्यकीय प्रवेशांत यंदापासूनच लागू होणार मराठा आरक्षण

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात चालू शैक्षणिक वर्षापासून मराठा आरक्षण देण्यास विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाने मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

SHARE

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात चालू शैक्षणिक वर्षापासून मराठा आरक्षण देण्यास विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाने मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशात आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चालू शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण लागू न करता ते पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात यावं, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यासाठी राज्य सरकारने एसईबीसी कायद्यात केलेली सुधारणा अवैध ठरवण्याची मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती. वैद्यकीय प्रवेशादरम्यान मराठा विद्यार्थ्यांना एसईबीसी कायद्यानुसार प्रवेश देणार नसल्याचं आश्वासन राज्य सरकारने दिल्याचंही याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं.  

परंतु प्रवेश प्रक्रिया आधी सुरु झाली असली, तरी आरक्षण प्रवेश देतानाच लागू होतं. त्यामुळे याचिकाकर्त्यांचा दावा वैध नसल्याचं राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाला सांगण्यात आलं. राज्य सरकारचा हा दावा उच्च न्यायालयाने स्वीकारत विरोधकांची याचिका फेटाळून लावली.

यंदापासूनच वैद्यकीय प्रवेशात आरक्षण लागू होणार असल्याने मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.हेही वाचा-

वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीच्या मुदतीत वाढ

मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखलसंबंधित विषय