Advertisement

राज ठाकरेंवर औरंगाबादेत गुन्हा दाखल, १२ अटींचे केले उल्लंघन

राज ठाकरेंवर औरंगाबदेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज ठाकरेंवर औरंगाबादेत गुन्हा दाखल, १२ अटींचे केले उल्लंघन
SHARES

राज ठाकरेंवर औरंगाबदेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या मनसेच्या सभेत १२ अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राज ठाकरेंसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सभेपूर्वी पोलिसांनी १६ अटी घातल्या होत्या. त्यापैकी १२ अटींचं उल्लंघन झाल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. पोलिसांच्या अटी किंवा नियमांचे पालन झाले नाही तर पोलिस कारवाई करतील, असा इशाराही दिला होता. आरोपी नंबर एक म्हणजे मुख्य आरोपी असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

११६, ११७ आणि १५३ अशी कलमं राज ठाकरेंवर लावण्यात आला आहे. त्यामध्ये समुहामध्ये भांडण लावणे, चितावणीखोर भाषण आणि पोलिसांच्या अटी शर्थींचा भंग असे हे कलम आहेत. हे सर्व अजामिनपात्र गुन्हे आहेत. अशा प्रकरणांमध्ये न्यायालयच जामीन देऊ शकते. त्यामुळे राज ठाकरेंना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज ठाकरेंवर गुन्हा झाल्याच्या मुद्द्यावर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, अल्टिमेटमवर राज्य चालत नाही. या इथल्या यंत्रणा सक्षम आहेत. नेतृत्व सक्षम आहे. हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर ते सर्वात मोठी चूक करत आहेत.



हेही वाचा

कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार - महाराष्ट्राचे डीजीपी रजनीश सेठ

राज ठाकरेंविरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा