Advertisement

क'र्नाटकी' राजकारणावर राज यांचे फटकारे

बहुमत नसतानाही भाजपाला सत्ता स्थापनेची संधी देण्यात आली. पण शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फ्लोअरटेस्ट होण्याआधीच अपयशाच्या भीतीने मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला. त्यावर काँग्रेस-जेडीएसने भाजपाच्या घशातून सत्ता बाहेर काढली, अशा आशयाचं व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढत भाजपाला पुन्हा टार्गेट केलं आहे.

क'र्नाटकी' राजकारणावर राज यांचे फटकारे
SHARES

कर्नाटक विधानसभेच्या निकालापासून ते येडियुरप्पांच्या राजीनाम्यापर्यंत कर्नाटकात चांगलंच राजकीय नाट्य रंगलं होतं. या राजकीय नाट्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून फटकारे लागावले आहेत.

घशातून सत्ता काढली

बहुमत नसतानाही भाजपाला सत्ता स्थापनेची संधी देण्यात आली. पण शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फ्लोअरटेस्ट होण्याआधीच अपयशाच्या भीतीने मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला. त्यावर काँग्रेस-जेडीएसने भाजपाच्या घशातून सत्ता बाहेर काढली, अशा आशयाचं व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढत भाजपाला पुन्हा टार्गेट केलं आहे.

मोदीमुक्त भारताचा नारा

राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेतच मोदीमुक्त भारताचा नारा दिला होता. त्यानंतर सातत्यानं राज ठाकरे सभा असो वा व्यंगचित्र या माध्यमातून भाजपावर आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. त्याचाच प्रत्यय राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रातूनही दिसत आहे.

इव्हीएम मशिनचा विजय असो ...

कर्नाटक निकालात १०४ जागा जिंकत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. या निकालानंतर लागलीच राज ठाकरे यांनी इव्हीएम मशिनचा विजय असो, असं खोचक भाष्य करत भाजपाला टोला लगावला होता.

काय आहे व्यंगचित्रात?

भाजपाचे अमित शहा यांच्या घशात हात घालून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कशी सत्ता बाहेर काढली हे राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून दाखवलं आहे. राहुल यांच्या बाजूला जेडीएसचे नेते कुमारस्वीमीही दिसत आहेत. राज ठाकरे यांचं हे व्यंगचित्र नेटकऱ्यांच्या चांगलंच पसंतीस पडत आहे.

हेही वाचा-

मोदींच्या बुलेट ट्रेनविरोधात ठाकरे बंधू एकवटले!

पालघरच्या आखाड्यात उद्धवचा सामना योगीशी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा