‘अशी’ असेल मनसेची शॅडो कॅबिनेट

मनसे हिंदुत्वाच्या (hindutva) वाटेवर जाणार असे स्पष्ट संकेत मिळाले. त्यापाठोपाठ सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी मनसेकडून ‘शॅडो कॅबिनेट’ची (Shadow cabinet) स्थापना करण्यात येईल, असंही म्हटलं जात आहे. चला जाणून घेऊया ‘शॅडो कॅबिनेट’ म्हणजे काय?

SHARE

मनसे हिंदुत्वाच्या (hindutva) वाटेवर जाणार असे स्पष्ट संकेत मिळाले. त्यापाठोपाठ सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी मनसेकडून ‘शॅडो कॅबिनेट’ची (Shadow cabinet) स्थापना करण्यात येईल, असंही म्हटलं जात आहे. चला जाणून घेऊया ‘शॅडो कॅबिनेट’ म्हणजे काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्यावहिल्या महाअधिवेशनात मनसेची (MNS) भूमिका समोर येऊ लागली आहे. गोरेगावच्या नेस्को ग्राऊंडवर (goregaon nesco) सुरू असलेल्या या महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी पक्षाच्या नवा भगव्या रंगाच्या झेंड्याचं (saffron flag) अनावरण केलं. 

हेही वाचा- अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड

‘शॅडो कॅबिनेट’ ही संकल्पना पाश्चिमात्य देशात खासकरून ब्रिटनमध्ये (britain) रुढ आहे. सत्ताधारी पक्षाच्या कामांवर वचक ठेवण्यासाठी विरोधी पक्षाकडून (opposition party) ‘शॅडो कॅबिनेट’ची (Shadow cabinet) स्थापना केली जाते. म्हणजे ज्याप्रमाणे सरकारमध्ये गृह, अर्थ, परराष्ट्र, व्यापार अशा वेगवेगळ्या खात्यांची जबाबदारी प्रत्येक नेत्याकडे सोपवली जाते. त्याचप्रमाणे विरोधी पक्षाकडूनही ‘शॅडो कॅबिनेट’च्या माध्यमातून प्रत्येक नेत्याकडे ठराविक विभागची (department) जबाबदारी देण्यात येते. त्यानुसार ‘शॅडो कॅबिनेट’मधील हे नेते प्रत्येक विभागावर नजर ठेवतात. तसंच सरकारने  (government) घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची पडताळणी हे ‘शॅडो कॅबिनेट’ करतं.  यामुळे सरकारच्या (ruling party) कामावर वचक निर्माण होतो.

याआधी महाराष्ट्रात (maharashtra) २००५ मध्ये आघाडी सरकारच्या काळात शिवसेना (shiv sena) आणि भाजपने (bjp) देखील ‘शॅडो कॅबिनेट’चा प्रयोग केला होता. देशात मध्य प्रदेश, केरळ आणि गोव्यातही असा प्रयोग करण्यात आला होता. त्यामुळे मनसे ‘शॅडो कॅबिनेट’चा प्रयोग करण्याची ही पहिली वेळ नाही. आता या ‘शॅडो कॅबिनेट’मध्ये मनसेच्या कुठल्या नेत्याचा समावेश करण्यात येईल, हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

हेही वाचा- ‘या’ ज्येष्ठ शिवसैनिकाने दिला मनसेला आशीर्वाद, तुम्हीच ऐका, काय म्हणाले…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी गुरूवारी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. यातून मनसे हिंदुत्वाच्या (hindutva) दिशेने जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असले तरी राज ठाकरे आपल्या भाषणातून नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोबतच राज यांच्या भूमिकेला शिवसैनिकांचाही (shiv sainik) पाठिंबा मिळत असल्याचं मनसेनं म्हटलं आहे. महाअधिवेशनासाठी राज्यभरातून मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. संध्याकाळी ६ च्या सुमारास राज ठाकरेंचं भाषण होणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या