Advertisement

अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड


अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (amit thackeray) यांची अखेर राजकारणात अधिकृत एण्ट्री झाली. मनसेच्या (MNS) पहिल्यावहिल्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी (mns leader) निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर व्यासपीठावर येऊन अमित यांनी मनसैनिकांचे आभार मानत हे नेतेपद स्वीकारलं.  

मनसेचं पहिलंवहिलं महाअधिवेशन गोरेगावच्या नेस्को (nesco goregaon) मैदानात सुरू आहे. या अधिवेशनात (seminar) मनसे कुठली भूमिका घेणार? पक्षाचा झेंडा कुठल्या रंगाचा असणार तसंच अमित ठाकरे पक्षात सक्रीय होणार की नाही? अशा एक ना अनेक प्रश्नाचा उलगडा टप्प्याटप्पयाने होऊ लागला आहे.

हेही वाचा- ‘या’ ज्येष्ठ शिवसैनिकाने दिला मनसेला आशीर्वाद, तुम्हीच ऐका, काय म्हणाले…

मनसेने आपला जुना  निळा, भगवा आणि हिरव्या रंगाचा झेंडा बदलून नवीन भगव्या रंगाचा, शिवरायांची राजमुद्रा असलेला (saffron flag) झेंडा स्वीकारला.  महाअधिवेशनाच्या निमित्ताने मनसेचे विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा या आशयाचे पोस्टर्स सर्वत्र लावले आहेत. यावरून मनसे हिंदुत्वाच्या (hindutva) दिशेने वाटचाल करणार असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यापाठोपाठ मनसे नेते बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी इतर ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या उपस्थितीत अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सभागृहात टाळ्याशिट्ट्यांचा एकच कडकडाट झाला.


अमित यांनी व्यासपीठावर येऊन सर्वांचे आभार मानत या नेतेपदाचा स्वीकार केला आणि आपली भूमिका मांडली ते म्हणाले, मनसेला स्थापन होऊन १४ वर्षे झाले, पण मी पहिल्यांदाच अधिकृतपणे पक्षाच्या व्यासपीठावर आलो आहे. खरं तर या घोषणेनंतर माझ्या पायाखालची वाळूच सरकली होती, कारण ही जबाबदारी खूप मोठी आहे. पण ही जबाबदारी पार पाडण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.

हेही वाचा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याचं अनावरण

सोबतच अमित यांनी शिक्षणाच्या संदर्भातील ठराव (education praposal) मांडला. ते म्हणाले, दप्तराचं ओझं कमी करण्याची कल्पना मी ह्याआधी अनेक माध्यमातून मांडली आहे. ती कल्पना म्हणजे विषयानुरूप जी पुस्तकं आहेत. ती चाचणी निहाय करून सर्व विषयाचं एक पुस्तक होऊ शकतं. ८ पुस्तकांचं वजन १ पुस्तकावर येईल आणि दप्तराचं ओझं कमी होईल." 

यावेळी  अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरे (sharmila thackeray) भावूक झाल्याचं पहायला मिळालं. अमित ठाकरे यांनी पदाचा विचार न करता लोकांच्या भल्यासाठी काम करावं. आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठिशी आहे. कुणाशीही तुलना करण्यापेक्षा काम महत्त्वाचं असल्याचं त्या म्हणाल्या.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा